nagpur-bjp-organises-ceremony-to-welcome-gadkari | Sarkarnama

नागपुरात उद्या गडकरींचे जंगी स्वागत, सांस्कृतिक कार्यक्रमाचीही मेजवानी

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 31 मे 2019

नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर आज झालेल्या खातेवाटपात नितीन गडकरींना रस्ते आणि दळणवळण खाते देण्यात आले आहे. उद्या 1 जूनला नितीन गडकरी शहरात येणार आहेत. त्यांच्या जोरदार स्वागताची तयारी शहर भाजपने केली आहे.

नागपूर : नव्या मंत्रीमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर आज झालेल्या खातेवाटपात नितीन गडकरींना रस्ते आणि दळणवळण खाते देण्यात आले आहे. उद्या 1 जूनला नितीन गडकरी शहरात येणार आहेत. त्यांच्या जोरदार स्वागताची तयारी शहर भाजपने केली आहे. स्वागतानंतर त्यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. हा नेत्रदीपक सोहळा सुरेश भट सभागृहात हजारो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजयानंतर भाजपमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. नितीन गडकरी यांनी 54 टक्के मते घेऊन विजय मिळविला. काल तिसऱ्या क्रमांकावर त्यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. आज झालेल्या खातेवाटपानंतर उद्या ते नागपुरात येणार आहेत. विमानतळावर जोरदार स्वागत व त्यानंतर सुरेश भट सभागृहात भव्य सत्कार कार्यक्रमाची तयारी शहरातील आमदार, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

शहर भाजपाध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, आमदार सुधाकर देशमुख, आमदार प्रा.अनिल सोले, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार गिरीश व्यास, महापौर नंदा जिचकार, माजी महापौर प्रवीण
दटके, राजेश बागडी, किशोर पलांदुरकर, संदीप जाधव, दयाशंकर तिवारी, किशन गावंडे, महेंद्र राऊत, संजय ठाकरे, दिलीप गौर, बंडू राऊत, जयप्रकाश गुप्ता, अर्चना डेहनकर आदी उद्याच्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये व्यस्त आहेत. उद्याच्या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाल्याचे शहर भाजपच्यावतीने सांगण्यात आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख