भाजपला केरळचा कळवळा, शेतकऱ्यांबद्दल मौन

केरळमध्ये रा. स्व. संघाचे स्वयंसेवक व भाजपच्या कार्यकर्त्यांवर होत असलेल्या अत्याचाराबद्दल नागपुरातील भाजपने निषेध व्यक्त केला. हजारो किलोमीटर दूर असलेल्या केरळमधील हिंसाचाराबद्दल कळवळा आला आहे. परंतु, विदर्भात किटकनाशकांच्या फवारणीमुळे होत असलेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूबद्दल मात्र कोणताही सहानुभूती किंवा दुखवटा व्यक्त करावा, असे इथल्या पक्षसंघटनेला वाटलेले नाही.
भाजपला केरळचा कळवळा, शेतकऱ्यांबद्दल मौन

नागपूर : केरळमध्ये रा. स्व. संघाचे स्वयंसेवक व भाजपच्या कार्यकर्त्यांवर होत असलेल्या अत्याचाराबद्दल नागपुरातील भाजपने निषेध व्यक्त केला. हजारो किलोमीटर दूर असलेल्या केरळमधील हिंसाचाराबद्दल कळवळा आला आहे. परंतु, विदर्भात किटकनाशकांच्या फवारणीमुळे होत असलेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूबद्दल मात्र कोणताही सहानुभूती किंवा दुखवटा व्यक्त करावा, असे इथल्या पक्षसंघटनेला वाटलेले नाही.

नागपूर भाजपचे अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे यांच्या नेतृत्वात नागपुरात आंदोलन करण्यात आले. यावेळी केरळमध्ये होत असलेल्या हिंसाचाराचा निषेध व्यक्त केला. केरळमध्ये होत असलेला हिंसाचार लोकशाहीच्या विरोधात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या आंदोलनात आमदार, पदाधिकारी व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनाही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.

केरळमध्ये होत असलेल्या हिंसाचाराबद्दल निषेध व्यक्त करणाऱ्या भाजपच्या शहर अध्यक्षांनी मात्र विदर्भातील शेतकऱ्यांच्या मृत्यूबद्दल दुखवटा व्यक्त केला नाही. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात 23 शेतकऱ्यांचा किटकनाशकांच्या फवारणीमुळे मृत्यू पावले आहेत. विदर्भात जवळपास 40 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूबद्दल भाजपच्या अध्यक्षांनी चकार शब्दही काढला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com