नागपूर अधिवेशन : हजारावर लक्षवेधी आणि मंत्री सहा !

सोमवारपासून सचिवालयाचे कामकाज सुरू झाले. आतापर्यंत हजारावर लक्षवेधी दाखल झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार विधानसभेसाठी 744 तर विधान परिषदमध्ये 384 लक्षवेधी दाखल झाल्या आहेत.
nagpur-assembly
nagpur-assembly

नागपूर  : सोमवारपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आमदारांनी लक्षवेधी प्रश्नांचा पाऊस पाडला आहे. हिवाळी अधिवेशनासाठी आतापर्यंत हजारांपेक्षा अधिक लक्षवेधी दाखल झाल्या असून फक्त सहा मंत्र्यांना या लक्षवेधींचा  सामना करावा लागणार आहे. 


 . त्यामुळे सर्वांची उत्तरे देताना सत्ताधाऱ्यांची चांगलीच दमछाक होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सचिवालयाकडे प्राप्त झालेल्या लक्षवेधींमध्ये महिला सुरक्षा, कायदा सुव्यवस्था, शेतकऱ्याच्या समस्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे समजते.

सोमवारपासून (ता.16) हिवाळी अधिवेशनाचे सत्र सुरू होत आहे. विविध आयुधांच्या माध्यमातून सदस्य मुद्दे मांडून न्याय मिळविण्याचा प्रयत्नात असतात. सदस्यांसाठी तारांकित प्रश्‍न आणि लक्षवेधी हे मोठे हत्यार आहेत. यंदा तारांकित प्रश्‍न नसणार आहे. त्यामुळे सदस्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्‍न मांडण्यावर भर दिल्याचे दिसते. 


सोमवारपासून सचिवालयाचे कामकाज सुरू झाले. आतापर्यंत हजारावर लक्षवेधी दाखल झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार विधानसभेसाठी 744 तर विधान परिषदमध्ये 384 लक्षवेधी दाखल झाल्या आहेत. बहुतांश लक्षवेधी महिलांवरील अत्याचार, त्यांची सुरक्षा, कायदा सुव्यवस्था, शेतकरी, शेती नुकसान, बाजारभावाबाबत असल्याचे समजते.

हा आकडा दीड हजाराच्या घरात जाण्याची शक्‍यता आहे. एकच विषय असेल तरी काही लक्षवेधी एकत्रित केल्या जातात. त्यानंतरच त्या लक्षवेधी सभागृहात चर्चेला येतील. यंदा एकच आठवड्यांचे अधिवेशन निश्‍चित करण्यात आले आहे. प्रश्‍नोत्तराचा तास नसला तरी मोठ्या संख्येने लक्षवेधी पटलावर ठेवणे, पुकारणे आणि उत्तर देणे अशी मोठी कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे.

यंदा तारांकित प्रश्‍नांसोबत अशासकीय ठरावही सादर होणार नाहीत. सरकार स्थापनेस झालेला उशीर आणि अधिवेशनाच्या तयारीकरिता मिळालेला कमी वेळ यामुळे हे दोन्ही विषय यंदा घेण्यात येणार नसल्याची माहिती आहे. इतर कामकाज होणार आहे. पहिल्या दिवशी अभिनंदन प्रस्तावसोबत पुरवणी मागण्यासादर होतील. राज्यपालांच्या अभिभाषणावरही चर्चा होईल.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com