रविकांत तुपकरांच्या गावात सुरू झाले लसीकरण, जिल्हाधिकाऱ्यांनी केले उद्घाटन...

या शिबिरात १०० नागरिकांना कोरोना विरोधी लसीचा पहिला डोस देण्यात आला तर काहींना दुसरा डोस देण्यात आला. जि.प. सदस्य सविता बाहेकर यांनी आरोग्य यंत्रणेला गावकऱ्यांनी सहकार्य करण्याची भूमिका ठेवा असे सांगितले.
Sarkarnama Banner
Sarkarnama Banner

बुलडाणा : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लसीकरण (Vaccination) हाच एक रामबाण उपाय असल्याने प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधक लस देण्यावर भर दिला जात आहे. आपल्याही गावातील नागरिक लस घेऊन कोरोनापासून सुरक्षित राहू शकतील, (Can be protected from corona) या उद्देशाने सावळा गावाचे भूमिपुत्र रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी सावळा (Sawala) येथे लसीकरण शिबिर घेण्याची मागणी ६ मे रोजी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे (District Healt Officer) पत्राद्वारे व प्रत्यक्ष भेटून केली होती. त्यानुसार सावळा येथे लसीकरण शिबिर घेण्यात आले. १३ मे रोजी झालेल्या या लसीकरण शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी एस. राममूर्ती (S Rammurti) यांच्या हस्ते पार पडले. 

नागरिकांनी न घाबरता लसीकरणासाठी व कोरोना चाचणीसाठी पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी यावेळी केले. या लसीकरण शिबिरात प्रामुख्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, जिल्हा परिषद सदस्य सविता बाहेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी राजेंद्र सांगळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश राठोड उपस्थित होते. सावळा गावात अजूनपर्यंत लसीकरणाला सुरुवात झाली नव्हती. काही निवडक नागरिकांनी बाहेरगावी जाऊन पहिला डोस घेतला होता. परंतु गावात वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत पहिल्यांदाच लसीकरण शिबिर झाले. 

उद्घाटनप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारी एस.राममूर्ती म्हणाले की, ग्रामीण भागातील लोकांचे लसीकरणाबद्दल काही गैरसमज आहेत, ते आधी दूर केले पाहिजे. लसीकरणाचे कुठलेही दुष्परिणाम होत नाही. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण करणे, हाच रामबाण उपाय आहे. तसेच कोरोना चाचणी करण्यासाठीही घाबरू नका. लसीकरण व कोरोना चाचणी खूप आवश्यक आहे. त्यासाठी पुढे या, असे जिल्हाधिकारी म्हणाले. लसींचा तुटवडा लवकरच दूर होईल. केंद्रांवर गर्दी न करता टप्प्याटप्प्याने जशी लस उपलब्ध होईल, तशी घ्या, असेही आवाहन त्यांनी केले. 

रविकांत तुपकर म्हणाले की, गावागावांत तरुणांनी कोरोनामुक्त व लसीकरण युक्त गाव करण्याचा संकल्प केला पाहिजे. कोरोना होणे याला कमीपणा मानू नका व झाला तर लपवू नका. लक्षण दिसल्यास स्वतःहून टेस्ट करायला पुढे या व विलगीकरणात राहणे पसंत करा. ग्रामीण भाग कोरोना मुक्त करायचा असेल, तर तरुणांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्रित आले पाहिजे, असेही तुपकरांनी सांगितले. या शिबिरात १०० नागरिकांना कोरोना विरोधी लसीचा पहिला डोस देण्यात आला तर काहींना दुसरा डोस देण्यात आला. जि.प. सदस्य सविता बाहेकर यांनी आरोग्य यंत्रणेला गावकऱ्यांनी सहकार्य करण्याची भूमिका ठेवा असे सांगितले. यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविका उपस्थित होते. 

हेही वाचा : मुख्यमंत्री ठाकरे हायकोर्टाची पायरी चढले..... पण या कारणासाठी!
                       
जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीप्रश्नाचा घेतला आढावा
लसीकरण शिबिराच्या निमित्ताने सावळा गावात आलेले जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांनी पाण्याचे टँकर बघून गावातील पाणीपुरवठ्याच्या विहिरीची पाहणी केली व पाणी प्रश्नाचा आढावा घेतला. रविकांत तुपकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना गावाच्या समस्यांबाबत व परिस्थितीबाबत माहिती दिली. संथ गतीने होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाबाबत तुपकरांनी आक्षेप नोंदविला. पाणी पातळी वाढण्यासाठी गावांमध्ये केलेल्या रिचार्ज शाफ्टची (बोअर) पाहणीही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केली. पाणी पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची अजून गरज आहे, असेही ते म्हणाले.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com