आजचा वाढदिवस : रविकांत तुपकर, आंदोलनातच नाही तर रचनात्मक कामातही पुढे...!

पहिल्या लॉकडाऊननंतर रक्ताचा तुटवडा पाहता रक्तदान शिबिर आयोजित केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून कोरोनाच्या दहशतीतही शेकडो तरुण-तरुणींनी रक्तदान केले आणि नंतर रक्तदान शिबिरांसाठी इतरांनीही पुढाकार घेतला.
Aajcha Wadhdiwas - Ravikant Tupkar
Aajcha Wadhdiwas - Ravikant Tupkar

कोणताही राजकीय वारसा (Political heritage) नसलेल्या अगदी सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी बरीच वर्षे बुलडाण्यात दूध, दही विकण्याचा वडिलोपार्जित व्यवसाय केला आहे. गावातील पाणी समस्येपासून आंदोलनाला सुरुवात केली (The movement began) आणि पुढे शेतकरी चळवळीत उडी घेतली. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे गेल्या १७ - १८ वर्षांच्या काळात आंदोलनातूनच हे नेतृत्व बहरलं, फुललं आणि परिपक्व झालं आहे. दरम्यानच्या काळात वारंवार राजकीय उपेक्षा वाट्याला आल्यानंतरही (Even after political neglect) खचून न जाता रविकांत तुपकर यांनी चळवळ, आंदोलन आणि जनसेवा सुरुच ठेवली. गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या संकट काळात तुपकर अनेकांसाठी देवदूत ठरले आहेत. (Tupkar became an angel for many) राज्यात व राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकून पडलेल्या शेकडो विद्यार्थी, मजुरांना तुपकरांनी स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरच्या माध्यमातून मदतीचा हात दिला. शेकडो गरजू कुटुंबांना मदत मिळवून दिली, पहिल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक रुग्णांना उपचार मिळवून दिले. (Many patients received treatment during the first lockdown.)

पहिल्या लॉकडाऊननंतर रक्ताचा तुटवडा पाहता रक्तदान शिबिर आयोजित केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून कोरोनाच्या दहशतीतही शेकडो तरुण-तरुणींनी रक्तदान केले आणि नंतर रक्तदान शिबिरांसाठी इतरांनीही पुढाकार घेतला, हे विशेष. पहिल्या लॉकडाऊनपासून ते आता थेट दुसऱ्या लॉकडाऊनपर्यंत म्हणजे गेल्या दीड वर्षापासून जनसेवेचं काम अविरत सुरू आहे. नुकतेच त्यांच्या संकल्पनेतून किन्हाळा येथे लोकसहभागातून जिल्ह्यातील पहिले कोरोना आयसोलेशन सेंटर निर्माण झाले आणि हा पॅटर्न आता जिल्हाभर रुजू होत आहे. कोरोनाच्या संकटकाळात पक्ष, राजकारण, सत्ताधारी, विरोधक अशी कोणतीच पुसटशीही अडसर न ठेवता जनसेवा हाच एकमेव धर्म रविकांत तुपकर आणि त्यांच्या 'स्वाभिमानी' हेल्पलाइन सेंटरच्या माध्यमातून सुरू आहे. रविकांत तुपकर यांनी आजवर आपला वाढदिवस साजरा केला नाही, बॅनर, पोस्टर्स किंवा वाढदिवसाचा कार्यक्रम कधीच पार पडला नाही, तसा यावेळीही पडणार नाही. १३ मे हा त्यांचा जन्मदिवस जनसेवेचं व्रत जोपासणाऱ्या या योद्ध्याला निसर्गनिर्माता आणखी लढण्याचे बळ देवो, हीच सदिच्छा.

शेतकरी चळवळीच्या मुशीत आणि आंदोलनांच्या आगीत तावून सुलाखून निघालेलं नेतृत्व म्हणून रविकांत तुपकरांकडे पाहिले जाते. सबंध महाराष्ट्रभर धडाडीचे युवा नेतृत्व म्हणून रविकांत तुपकर यांची ओळख आहे. गेल्या १८ ते २० वर्षांपासून शेतकरी चळवळीत काम करत असताना राज्याच्या राजकीय पटलावर आपली घट्ट आणि सुस्पष्ट ओळख त्यांनी निर्माण केली आहे. दरम्यान गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या संकटकाळात राजकारण, पक्ष, जात, धर्म, पंथ आणि इतर सर्वच भेद बाजूला सारून अविरत गरजूंची सेवा ते करत असल्याने जनसेवेचं व्रत जोपासणारा योद्धा म्हटल्यास वावगं ठरणार नाही. तुपकरांकडे कोणतेही आमदार, खासदार पद नाही. पण तरीही राजकीय मैदान गाजवायला हा पठ्ठ्या पुढे असतो. प्रशासनात राज्यभर त्यांच्या शब्दाला किंमत आहे. अर्थात ते नैतिकतेच्या व आंदोलनांच्या जोरावर. लोकप्रतिनिधींच्या / मंत्र्यांच्या दारात जेवढी गर्दी असते, त्याहून अधिक गर्दी तुपकरांच्या हेल्पलाईन सेंटरमध्ये असते. आंदोलकच नाही तर रचनात्मक कामातही त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. 

आंदोलन आणि रविकांत तुपकर हे अतूट नात निर्माण झालेलं आहे. वेळप्रसंगी या आंदोलनामुळे त्यांना जेलची हवाही खावी लागली, तडीपार देखील व्हावं लागलं. पण शेतकरी चळवळ, आंदोलन आणि लढा त्यांनी सोडला नाही. राजकीय उपेक्षा सोसुनही जनसेवेचं व्रत कायम जोपासत हा नेता आपल्या कर्तृत्वातून आपले वेगळेपण कायम ठेवून आहे. सत्तेचं किंवा विरोधी पक्षाचं असे कोणतेच पद नसतानाही कायम जनसामान्यांच्या हितासाठी, गरजूंच्या मदतीसाठी धडपडणारा हा युवा नेता आज लाखो युवकांचे प्रेरणास्थान आणि आदर्श आहे ते केवळ आपल्या कर्तुत्वामुळेच. शेतकरी चळवळ आणि शेतकरी हिताला महत्व देणाऱ्या या नेत्याने राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेल्या वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदाला एका फटक्यात दूर करून आंदोलनात उडी घेण्याचं अफाट धाडस दाखवून सर्वांनाच धक्का दिला होता. सत्तेच्या पदासाठी लोक चळवळ, पक्ष कार्य अगदी सर्वच सोडून देतात. परंतु या नेत्याने सत्तेच पद सोडून चळवळीला जवळ केले आणि यातुनच त्यांचे शेतकरी प्रेम, चळवळीशी असलेली निष्ठा सिद्ध झाली.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com