अकोल्यात शिवसैनिकांनी काढली नारायण राणेंच्या पुतळ्याची धिंड...

आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि आमदार नितीन देशमुख यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर प्रखर शब्दात टीका केली. भाजपने बडबड करण्यासाठीच राणेला सोडले असल्याचे दोन्ही आमदार म्हणाले.
Sarkarnama
Sarkarnama

अकोला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे The Chief Minister Uddhav Thackeray यांच्या विरोधात बोलणारे भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे Union Minister Narayan Rane यांच्या पुतळ्याची अकोल्यात शिवसैनिकांनी धिंड काढली. मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी एकत्र येत भाजप कार्यालयाकडे कूच केल्याने पोलिसांना तगडा बंदोबस्त लावावा लागला. भाजप कार्यालयापुढे निदर्शने करीत असताना पोलिसांसोबत शिवसैनिकांची लोटालाटी झाली. राणेंच्या विरोधात प्रचंड नारेबाजी करण्यात आली.
   
नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा सर्वत्र निषेध होत आहे. संतप्त शिवसैनिकांनी आज सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास जुने शहरातील जयहिंद चौकातून गांधी रोडवरील खुले नाट्यगृहासमोरील भाजप कार्यालयापर्यंत राणेंच्या पुतळ्याची धिंड काढली. शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, आमदार गोपीकिशन बाजोरिया, सहसंपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकर, शहरप्रमुख राजेश मिश्रा आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिकांची उपस्थिती होती. राणेंचा पुतळा घेवून भाजप कार्यालयाकडे निघालेल्या शिवसैनिकांना खुले नाट्यगृह परिसरात भाजप कार्यालयापुढे पोलिसांनी रोखले. 

शहरातील सर्व पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांनी पोलिस ताफ्यासह व पोलिसांच्या जदतकृती दलाच्या जवानांची तुकडी गांधी रोडवर पोहचली. भाजप कार्यालयाकडे जाण्यापूर्वीच शिवसैनिकांना रोखण्यात आले. त्यामुळे शिवसैनिक व पोलिसांमध्ये लोटालाटी झाल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर निदर्शने करून आणि राणेंच्या विरोधात घोषणाबाजी करीत शिवसैनिकांनी आंदोलनाचा समारोप केला. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला. 

आमदारांकडून राणेंवर टीका
आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि आमदार नितीन देशमुख यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर प्रखर शब्दात टीका केली. भाजपने बडबड करण्यासाठीच राणेला सोडले असल्याचे दोन्ही आमदार म्हणाले. 

गांधी रोड जाम
शिवसैनिकांनी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास जयहिंद चौकातून रॅलीने भाजप कार्यालयाकडे कुच केली. या रॅलीत मोठ्या संख्येने शिवसैनिक गोळा झाले असल्याने एक तासासाठी गांधी रोडची एक बाजू पूर्णपणे जाम झाली होती. एकाएकी करण्यात आलेल्या या आंदोलनाची माहिती पोलिसांनीही नव्हती. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांच्या गोपनिय शाखेचा फोलपना त्यामुळे उघडकीस आला.
Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com