मृताच्या कुटुंबीयांनाही हाकलले, येवढा कसा मुजोर झाला हा अधिकारी ?

विभागीय नियंत्रक अधिकारी संदीप रायलवार यांच्या त्रासापाई माझ्या पतीला हार्टअॅटॅक आला. त्यांच्या मृत्यूला डीसी जबाबदार आहेत. आता अनुकंपा अंतर्गत चकरा मारून थकलो आहे. आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही.
मृताच्या कुटुंबीयांनाही हाकलले, येवढा कसा मुजोर झाला हा अधिकारी ?
Anil Parab

बुलडाणा : एसटी महामंडळात चालक असलेल्या कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला. वर्षभर उपचार घेतल्यानंतर हलके काम करण्याचे रुग्णालयाने सुचविले. पण विभागीय नियंत्रक संदीप रायलवार यांनी त्याला कामावरूनच काढून टाकले. नंतर हलाखीच्या परिस्थितीत त्याचा मृत्यू झाला. कुटुंबीय अनुकंपावर नोकरीची मागणी करायला गेले असता, त्यांनाही रायलवारांनी हाकलून लावले. त्यामुळे येवढा कसा मुजोर झाला हा अधिकारी, असे म्हणत त्याला मंत्री अनिल परब यांनी आवरावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. 

एसटी महामंडळात चालक पदावर कार्यरत असलेले शिवानंद कडूबा गीते यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा वर्षभर रुग्णालयात उपचार सुरू होता. त्यानंतर हा कर्मचारी हलके आणि सोपे काम करण्यासाठी फिट असल्याचा अभिप्राय मेडिकल बोर्डाने दिला. मात्र, त्याला केराची टोपली दाखवत. त्या कर्मचाऱ्याला सोपे काम देण्याऐवजी थेट सेवेतूनच काढून टाकण्याचा धक्कादायक प्रकार बुलडाण्यात समोर आलाय. आता त्या कर्मचाऱ्याच्या नातेवाइकांना देखील कार्यालयातून धक्के मारून बाहेर काढले जात आहे.

शिवानंद गीते हे चिखली आगारांमध्ये चालक पदावर कार्यरत होते. डिसेंबर 2018 मध्ये त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे त्यांच्यावर एक वर्षभर उपचार करण्यात आले. त्यातून ते बरे झाले त्यानंतर त्यांना रुजू करण्यासाठी मेडिकल बोर्डाने हलके कामासाठी फिट असल्याचा अभिप्रायदेखील दिला. मात्र, या कर्मचाऱ्याला कामावरूनच काढून टाकले. विभागीय नियंत्रकांच्या या निर्णयामुळे नातेवाईक संतापले आहेत. त्याला पर्यायी नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी सांगण्यात आले.

या कर्मचाऱ्याने आरटीओ विभागाकडे आपल्या चालकपदाचे लायसन रद्द करण्यासाठी अर्ज केला. मात्र, या कार्यालयाकडून आणि विभाग नियंत्रकाच्या कार्यालयाकडूनदेखील कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. विभाग नियंत्रकांच्या हेकेखोर वृत्तीमुळे अखेर या कर्मचाऱ्याला रुजू केले गेले नाही. दुर्दैवाने या हृदयविकाराचा रुग्ण असलेल्या कर्मचाऱ्याचा 2020 मध्ये मृत्यू झाला. आता या कर्मचाऱ्याची पत्नी आणि त्यांचा मुलगा हे पाठपुरावा करून अनुकंपामध्ये नोकरीसाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, त्यांना प्रतिसाद देण्याऐवजी उद्धटपणे वागणूक मिळते.

विभागीय नियंत्रक संदीप रायलवार यांच्या कार्यपद्धतीविषयी बहुतांशी कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे. त्या रोषाचा केव्हाही बांध फुटू शकतो, अशी कर्मचाऱ्यांत चर्चा आहे. राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी या अधिकाऱ्याला समज देऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. या विभागीय नियंत्रक अधिकारी संदीप रायलवार यांच्या त्रासापाई माझ्या पतीला हार्टअॅटॅक आला. त्यांच्या मृत्यूला डीसी जबाबदार आहेत. आता अनुकंपा अंतर्गत चकरा मारून थकलो आहे. आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया मृत कर्मचाऱ्याच्या पत्नीने व्यक्त केली.

रायलवार बोलेना...
विभागीय नियंत्रक संदीप रायलवार यांना या प्रकाराविषयी जाणून घेण्यासाठी संपर्क केला. मात्र, त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. संबंधित कर्मचाऱ्याने कागदपत्रांची पूर्तता केली नव्हती. त्याचे नातेवाईक कार्यालयात येऊन हुज्जत घालतात. त्यामुळे त्यांना बाहेर जाण्यास सांगितले एवढंच, असेही रायलवार म्हणाले.
Edited By : Atul Mehere

Related Stories

No stories found.