मराठा आरक्षणासाठी सुनीता गडाख यांचा राजीनामा 

मराठा आरक्षणासाठी सुनीता गडाख यांचा राजीनामा 

नेवासे (जि. नगर) : इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा, धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे,या मागणीसाठी नेवासे पंचयात समितीच्या सभापती सुनीता गडाख यांनी आपल्या सभापती पदासह पंचायत समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे-पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. 

मंगळवारी (ता. 31) नेवासे पंचायत समितीच्या सभापती सुनीता गडाख यांनी आपल्या सभापती व सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने मराठा, धनगर व मुस्लिम समाजातून त्यांच्या भूमिकेचे करण्यात आले. 

गेल्या वर्षभरात मराठा समाजाचे 58 मोर्चे शांततेत झाले आहे, परंतु राज्य शासनातर्फे हा प्रश्न न्यायालयात व मागास आयोगाकडे प्रलंबित आहे, अशा सबबी पुढे करून वेळकाढूपणा करण्यात आला आहे. मराठा, धनगर व मुस्लिम समाजाला राज्यकर्त्यांनी झुलवत ठेवले त्याचा निषेध म्हणून मी माझ्या सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. यापुठे आंदोलनात सक्रिय पाठिंबा राहणार असल्याचे सुनीता गडाख यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com