शिवसेना नगरसेविकेचे पतीसह महापौरांविरुद्ध शोले स्टाईल आंदोलन - Sholay style agitation against the mayor with Shiv Sena corporator's husband | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेना नगरसेविकेचे पतीसह महापौरांविरुद्ध शोले स्टाईल आंदोलन

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 7 डिसेंबर 2020

या भागातील नागरिकांनी देखील वेळोवेळी लोकप्रतिनिधींकडे तक्रारी मांडल्यानंतर  नगरसेविका किरण गामणे यांनी आपले पती व नागरिकांसह  पाथर्डी फाटा येथील जलकुंभावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.

सिडको : पाथर्डी फाटा उत्तम नगर पवननगर या परिसरात वेळी-अवेळी होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. महापालिकेच्या या अनागोंदी कारभाराच्या विरोधात  सिडकोतील शिवसेना नगरसेविका किरण गामणे-दराडे व त्यांचे पती योगेश (बाळा) दराडे यांनी आज चक्क जलकुंभावर चढून मनपा व महापौरांचा निषेध करीत आंदोलन केले.

सिडको विभागातील पाणीपुरवठा करण्यासाठी पाथर्डी फाटा येथे जलकुंभ आहे. काही दिवसापासून प्रभाग क्रमांक २७, २८ आणि २९ प्रभागात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांनी महापालिका कार्यालयात अनेक तक्रारी केल्या. परंतु वेळोवेळी तक्रारी करून देखील पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप नगरसेविका किरण गोमणे यांनी केला.

या भागातील नागरिकांनी देखील वेळोवेळी लोकप्रतिनिधींकडे तक्रारी मांडल्यानंतर  नगरसेविका किरण गामणे यांनी आपले पती व नागरिकांसह  पाथर्डी फाटा येथील जलकुंभावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.

शिवसेना नगरसेविका किरण गामणे यांनी ऑनलाइन महासभेत सहभाग नोंदवत आपल्या प्रभागातील पाणी सत्ताधारी पक्षाचे महापौर हे स्वतःच्या प्रभागात पळवत असल्याचा आरोप केला. तसेच सिडको परिसराचे पाणी पळवणाऱ्या‍ महापौरांचा निषेध असो,भाजप महापौर हाय हाय अशा घोषणाही दिल्या.

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख