रोहित पवारांनी ट्रॅक्टरमधून केली पूरग्रस्त भागाची पाहाणी

पुरामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. पिके पाण्यात आहेत. या सर्व नुकसानीचा पंचनामा करुन शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळवून देण्यास शासनाला भाग पाडू, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
रोहित पवारांनी ट्रॅक्टरमधून केली पूरग्रस्त भागाची पाहाणी

सिद्धटेक (नगर) - केवळ पूरग्रस्त भागाची पाहणी करुन फोटो काढण्यासाठी मी येथे आलो नाही. येथे पाहणीसाठी आल्यानंतर येथे किती अंधार आहे, हे लक्षात आले. येथे आरोग्य सुविधा नाहीत, आपत्कालीन यंत्रणेचा मागमूस नाही, पूरात अडकल्यानंतर उपलब्ध सुविधा नाहीत. पुरामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. पिके पाण्यात आहेत. या सर्व नुकसानीचा पंचनामा करुन शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळवून देण्यास शासनाला भाग पाडू, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

भांबोरे, दुधोडी, बेर्डी, गणेशवाडी, देऊळवाडी, सिद्धटेक, जलालपूर या पूरग्रस्त गावांची पाहणी पवार यांनी आज केली. त्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, तालुक्यातील पश्चिम पट्टा हा भीमा नदीचा बागायती भाग आहे. ऊसासारख्या नगदी पिकावरच येथील अर्थकारण अवलंबून आहे. त्यामुळे येथे बारमाही पाणी उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. त्यासाठी 'उजनी' धरणाच्या व शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्याचे नियोजन प्राधान्याने करणे गरजेचे आहे. त्यासाठीही मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. अनेक शेतकऱ्यांच्या कांदा चाळीत पाणी शिरले आहे, घरे पाण्याने वेढली आहेत. त्यांना मदतीची गरज आहे. बुडीत बंधाऱ्यांच्या प्रश्नातही आपण जातीने लक्ष घालणार आहोत.

ट्रॅक्टरमधून ओढा पार...
रोहित पवार यांनी भांबोरे येथील पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर त्यांना पुढे दुधोडी येथून सिद्धटेक येथे यायचे होते. या मार्गात असणाऱ्या ओढ्यातून त्यांनी ट्रॅक्टरमध्ये बसून मार्ग काढला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com