पेट्रोल, डिझेल फक्त सकाळी पाच ते नऊपर्यंतच मिळणार 

नगर जिल्ह्यातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशसान रोज वेगवेगळे आदेश काढत आहे.
पेट्रोल, डिझेल फक्त सकाळी पाच ते नऊपर्यंतच मिळणार 
nagar petrol diesel sale restrictions

नगर, ता. 24 ः कोरोनो विषाणुच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये, तसेच लोकांनी बाहेर पडू नये, यासाठी 31 तारखेपर्यंत पेट्रोल व डिझेल विक्री फक्त सकाळी पाच ते नऊ वाजेपर्य़ंत असे चारच तास सुरू राहणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आदेश दिले आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणुन नागरीकांची एका ठिकाणी होणारी गर्टी टाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्वच पेट्रोलपंपांना हे आदेश आहेत. 

राज्य सरकारने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात राथरोग प्रतिबंधात्मक कायादा 1897 लागूकेला आहे. त्याअन्वये जिल्हाधिकारी रोज काही ना काही नवीन आदेश देऊन गर्दी नियंत्रणासाठी प्रयत्न करीत आहेत.

अनेकांनी भरल्या टाक्या

दरम्यान, हे आदेश येण्याच्या आधीपासूनच लोकांनी गाड्यांच्या टाक्या भरून घेतल्या आहेत. जनता कर्फ्यु लागण्याच्या आधल्या दिवशी पेट्रोल पंपांवर रांगा लागल्या होत्या. त्यानंतरही शक्य होईल तेवढे पेट्रोल टाक्यांमध्ये साठवून ठेवून लोक तरतूद करीत आहेत. आता सकाळी केवळ चार तास पेट्रोल पंप सुरू राहणार असले, तरी तेथे गर्दी होऊ नये म्हणून पेट्रोल पंप चालकांना सूचना देण्यात आल्या आहेत. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in