Ahmednagar Crime News: राष्ट्रवादीच्या कामगार सेल जिल्हाध्यक्षाची व्यावसायिकाला जबर मारहाण

Ahmednagar Crime News: शहरात कायद्याचं राज्य उरलं नसून गुंडशाहीचं राज्य...
Ahmednagar Crime News
Ahmednagar Crime NewsSarkarnama

Ahmednagar Crime News: अहमदनगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगार सेलच्या जिल्हाध्यक्षाकडून भरदुपारी व्यावसायिकाला जबर मारहाण करण्यात आली राजू जग्गी यांना जबर मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मारहाण प्रकरणी महिलांवर देखील हल्ला केला गेला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलचा जिल्हाध्यक्ष गजानन अरविंद भांडवलकर यांच्यासह त्यांच्या बंधूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी (Ncp)चा पदाधिकारी गजानन भांडवलकर हा देखील जिल्हा पोलीस अधीक्षक हल्ला प्रकरणातील जामिनावरील आरोपी आहे. दोन दिवसांपूर्वी माजी नगरसेवक संजय झिंजे यांच्यावर हल्ला करणारा राष्ट्रवादीचाच पदाधिकारी सुरज जाधव हा देखील याच प्रकरणातील आरोपी आहे. काळे यांनी तातडीने ईमेलद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन पाठवत शहरातील गुंडगिरीचा तात्काळ बंदोबस्त करण्याची काँग्रेसच्या वतीने मागणी केली आहे.

Ahmednagar Crime News
गुलाबराव पाटील - नाना पटोले यांच्यात चर्चा; अजितदादाही गालातल्या गालात हसले; नेमक काय घडलं?

जखमी राजू जग्गी यांची बुधवारी रात्री उशिरा काळे यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह रुग्णालयात जाऊन समक्ष भेट घेत विचारपूस केली. भयभीत जग्गी कुटुंबीयांना धीर दिला. यावेळी उद्योजक प्रदीपशेठ पंजाबी, राजू जग्गी यांचे कुटुंबीय, शीख समाज बांधव, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील आदी उपस्थित होते.

Ahmednagar Crime News
Fadanvis यांच्या जिल्ह्यात मंत्र्यांचे पुतळे जळत होते, पण पोलिसांना साधी भनकही नव्हती !

शहरात कायद्याचं राज्य उरलं नसून गुंडशाहीचं राज्य...

अहमदनगर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले, दररोज शहराच्या वेगवेगळ्या भागात कुणा ना कुणावर तरी हल्ले सुरू आहेत. गुंडांनी शहरात धुडगूस घातला आहे. तारकपूरच्या गर्दीच्या रहिवासी भागात भर दुपारी शहरातील नामांकित उद्योजक राजू जग्गी यांना जबर मारहाण केली गेली. महिलांवर देखील हल्ला केला गेला आहे. पोलिसांच्या बघ्याच्या भूमिकेमुळे शहरात कायद्याचे, लोकशाहीचे राज्य उरले नसून गुंडांचे गुंडशाहीचे राज्य सुरु असल्याची संतप्त प्रतिक्रिया शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in