नगर दक्षिण लोकसभा राष्ट्रवादीचं लढवणार : राजेंद्र फाळके 

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीचीच होती,आगामी काळातही राष्ट्रवादीचीच राहील..-राजेंद्र फाळके
नगर दक्षिण लोकसभा राष्ट्रवादीचं लढवणार : राजेंद्र फाळके 

नगर : "  नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीचीच होती, आगामी काळातही राष्ट्रवादीचीच राहील.काॅग्रेस - राष्ट्रवादीच्या आघाडीत या जागेत आता बदल नाही," असे ठासून सांगत राष्ट्रवादी काॅग्रेसचे नव्याने नियुक्त झालेले जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी या विषयाला पूर्णविराम दिला आहे.

फाळके यांनी पत्रकारांशी बोलताना ही जागा राष्ट्रवादीचीच राहणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, " नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचेच वर्चस्व आहे. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या मंत्राप्रमाणे एक बुथ दहा युथ अशी संकल्पना राबविणार आहे. पक्षसंघटन वाढविण्यासाठी आठ ते पंधरा दिवसांत सर्व नेत्यांशी बोलून बुथ कमिटी तयार करण्यात येईल."

" पक्षाच्या जिल्हा  कार्यालयात आठवड्यातील तीन ते चार दिवस थांबून कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या जातील. आघाडीसंदर्भात निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आठवड्यातील तीन ते चार दिवस थांबून कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या जातील. कळसुबाई ते सिद्धटेक परिसर "राष्ट्रवादी काॅग्रेसमय करणार आहोत. पक्ष हा कुटुंबाप्रमाणे आहे. कुटुंबातील वाद कुटुंबातच राहतील. पक्ष एकसंघ राहिल, असे फाळके म्हणाले.

' महापालिकेत सत्ता राष्ट्रवादी काॅग्रेसचीच येणार आहे. पक्ष संघटन वाढविण्यासाठी आमदार संग्राम जगताप व शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते हे शहरातील कार्यकर्त्यांची फळी वाढवित आहेत, त्यामुळे आगामी काळात महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता येणार आहे ,"असेही  फाळके म्हणाले.

विरोधी पक्षाला हादरा देणार

गोळाबेरीज करण्याची शिकवण शरद पवार यांची आहे. त्यानुसार पक्षातून नाराज होऊन गेलेले नेते व कार्यकर्ते पुन्हा पक्षात आणण्यासाठी प्रयत्न करणारआहे. आता विरोधी पक्षांना हादरा देण्याचे काम केले जाईल.

कर्जत तालुक्याला दोन महत्त्वाची पदे मिळाली, याबाबत फाळके म्हणाले, "सक्षमपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षात कायम संधी मिळते. महिला जिल्हाध्यक्षा चांगले काम करीत आहेत. त्यामुळे त्यांना संधी मिळाली आहे . "

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in