हजारे, पवार यांच्या उपस्थितीत आमदार जगताप यांचे `स्वच्छ प्रेरणा अभियान` सुरू

आमदार संग्राम जगताप यांच्या संकल्पनेतून निरोगी, सुंदर आणि समृद्ध शहराकडे यशस्वी वाटचाल करण्यासाठी 'स्वच्छ प्रेरणा अभियान' या अभिनव उपक्रमाचा प्रारंभ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, राज्याच्या आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार आदींच्या उपस्थितीत काल करण्यात आला
Nagar MLA Sangram Jagtap Launches Clean City Mission
Nagar MLA Sangram Jagtap Launches Clean City Mission

नगर : आमदार संग्राम जगताप यांच्या संकल्पनेतून निरोगी, सुंदर आणि समृद्ध शहराकडे यशस्वी वाटचाल करण्यासाठी 'स्वच्छ प्रेरणा अभियान' या अभिनव उपक्रमाचा प्रारंभ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, राज्याच्या आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार आदींच्या उपस्थितीत काल करण्यात आला.

नगरमध्ये दिमाखात झालेल्या या कार्यक्रमात पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल पवार, डॉ. तात्याराव लहाने आदींचा सत्कार करण्यात आला. नगर शहरात दैनंदिन कचरा संकलन केले जाते. महानगरपालिका प्रशासन व सर्व नागरिकांच्या सक्रिय सहभागातून नगर शहर ८० टक्के कचरामुक्त व कचरापेटीमुक्त करण्यात यश आले आहे. परंतु एवढ्यावरच न थांबता आमदार जगताप यांनी स्वच्छतेचे अभियान अधिक चांगले करण्यासाठी प्रय़त्न सुरू केले आहेत. निरोगी, सुंदर आणि समृद्ध शहराकडे यशस्वी वाटचाल करण्यासाठी सुरू केलेल्या 'स्वच्छ प्रेरणा अभियान' या अभिनव उपक्रमातून नगर शहराला देशात नावलौकिक असलेले नंबर एकचे स्वच्छ शहर बनविण्याचा विडा आमदार जगताप यांनी उचलला आहे. 

पोपटराव पवार यांचे मार्गदर्शन 

स्वच्छ अभियानात पोपटराव पवार यांचे आपल्याला मार्गदर्शन लाभणार असून, लवकरच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नगरसेवक व विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांच्या सहभागातून या कामाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. या उपक्रमात नगर शहरवासीयांचा सक्रिय सहभाग आवश्यक असून, आपण सर्वांनी मिळून नगर शहराला कचरा व कचराकुंडीमुक्त शहर करायचे आहे, असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com