आमदार रोहित पवार यांनी आपल्याच सरकारचे टोचले कान

महाराष्ट्रातील ( Maharashtra ) आरोग्यभरतीच्या गोंधळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) युवा आमदार रोहित पवार ( MLA Rohit Pawar ) यांनी महत्त्वाचे ट्विट केले आहे.
MLA Rohit Pawar slams opposition leaders of maharashtra
MLA Rohit Pawar slams opposition leaders of maharashtra

अहमदनगर : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या मोठी होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तर आरोग्य यंत्रणा कोलमडली होती. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने आरोग्यभरती करण्याचे ठरविले आहे. त्यासाठीच्या जाहिरातीही त्यांनी काढल्या मात्र ही आरोग्यभरती लालफितीच्या कारभारात अडकली आहे. MLA Rohit Pawar told the Chief Minister about the confusion in health recruitment ...

MLA Rohit Pawar slams opposition leaders of maharashtra
आमदार रोहित पवार यांना आला पोलिसांचा असा अनुभव

राज्यातील आरोग्यभरतीच्या गोंधळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी महत्त्वाचे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये रोहित पवारांनी म्हटले आहे की, मागील सरकारने आरोग्य भरती रखडवल्याने आरोग्य व्यवस्था खिळखिळी झाली. आपल्या सरकारने आरोग्य भरती सुरू केली पण गोंधळाचं वातावरण दिसतंय. असंच चालू राहिलं तर आधीच्या आणि आपल्या सरकारमध्ये काय फरक राहील? याचा राज्य सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा.

पुढे रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सुचविले आहे की, परीक्षा सुरळीत होणं आवश्यक होतं. अनेकांची आर्थिक स्थिती सामान्य आहे. परीक्षेला जाण्यासाठी त्यांनी उसने तर काहींनी व्याजाने पैसे आणले, परंतु आता त्यांना आर्थिक भुर्दंड बसलाय. त्यामुळं पुन्हा लवकर परीक्षा घ्यावी आणि त्यावेळी मोफत एसटी प्रवासाचा पर्याय देता येईल का,याचा विचार व्हावा.

तसंच रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, पारदर्शकतेसाठी ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याच्या देखरेखीत परीक्षा घेण्याबाबत विचार व्हावा. सध्या प्रत्येक पदासाठी व प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळी फी आकारली जाते, हे योग्य नाही. सरकारने यात लक्ष घालून परीक्षार्थींच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी विनंतीही ट्विटच्या माध्यमातून रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

MLA Rohit Pawar slams opposition leaders of maharashtra
मतदारसंघ विकासाचे मॉडेल बनवायचा आहे - आमदार रोहित पवार

कंत्राटी आरोग्य सेवकांचा प्रश्न

राज्यात मागील 10 ते 15 वर्षांपासून काम करत असलेल्या कंत्राटी आरोग्य सेविकांची अनेक दिवसांपासून कायम सेवेत घेण्याची मागणी आहे. ही मागणी या आरोग्य भरतीत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र या आरोग्य सेविकांना सेवेत घेण्याबाबतही गौंधळाची स्थिती आहे. काही महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी आरोग्य सेविकांना नोकरीत कायम केले आहे. मात्र राज्याकडून या बाबत निर्णय होत नसल्याने कंत्राटी आरोग्य सेवकांची संघटना आक्रमक आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com