कोरोना उपचार दरम्यान आमदार आशुतोष काळेंचे लक्ष मतदार संघातील कामांवर

आमदार आशुतोष काळे ( MLA Ashutosh kale ) मागील आठ दिवसांपासून एका खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत.
Aushutosh kale.jpg
Aushutosh kale.jpgsarkarnama

कोपरगाव : कोपरगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांची नुकतीच शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी निवड झाली. ही निवड झाल्यावर दोनच दिवसांत आमदार काळे यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. कोरोना होताच आमदार काळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते व कार्यकर्त्यांना या संदर्भात माहिती दिली. MLA Ashutosh Kale focuses on constituency work during Corona treatment

कोविड संसर्गाची बाधा झाल्याने खासगी रूग्णालयात उपचार घेत असलेल्या आमदार आशुतोष काळे यांनी काल (शनिवारी) आपल्या मतदारसंघातील अधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन बैठक घेतली. त्याद्वारे सर्वांना ड्युटी फस्ट असा संदेश दिला.

आमदार आशुतोष काळे मागील आठ दिवसांपासून एका खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. तब्येत उत्तम आहे. मात्र कोपरगाव विधानसभा मतदारसंघात डेंगी व चिकुनगुनीयाचे रूग्ण वाढू लागल्याने त्यांनी आज रुग्णालयातूनच ऑनलाइन बैठक घेतली. या दोन्ही आजारांवरील उपाययोजनाचा आढावा घेतला. सरकारी अधिकाऱ्यांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.

Aushutosh kale.jpg
आमदार आशुतोष काळे यांना कोरोनाची लागण

काळे म्हणाले, डेंगीचे रूग्ण वाढले आणि चिकुनगुनीयाने डोकेवर काढले आहे. अशा वेळी अधिकाऱ्यांनी गावोगाव प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात. डास निर्मुलन मोहिम हाती घ्यावी. काही अडचण असल्यास माझ्यासोबत संपर्क साधा आपण मदत करण्यासाठी पुढाकार घेऊ.

या बैठकीत तहसीलदार विजय बोराडे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका आरोग्याधिकारी डॉ. विकास घोलप, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, कोपरगाव नगर परिषदेच्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम रुग्णालयाच्या आरोग्याधिकारी डॉ. गायत्री कांडेकर आदींनी सहभाग घेतला. ही बैठक चर्चेचा विषय ठरली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com