राजकारणात लढा हा वैचारिक असावा

पारनेर ( parner ) तालुक्यातील भाजपचे नेते तथा जिल्हा परिषदेचे ( zp ) माजी उपाध्यक्ष सुजित झावरे ( sujit zaware ) यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
sujit zaware
sujit zawaresarkarnama

टाकळी ढोकेश्वर : राजकारणात नेते वाटल ते करून सत्ता टिकविण्याचा प्रयत्न करतात. या राजकीय खेळीत मात्र सामान्य कार्यकर्ते व नागरिकांची फरपट होते. ही बाब लक्षात घेऊन पारनेर तालुक्यातील भाजपचे नेते तथा जिल्हा परिषदेचे ( zp ) माजी उपाध्यक्ष सुजित झावरे ( sujit zaware ) यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचे अनेक अर्थ लावत पारनेर तालुक्यात जोरदार राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

जाधववाडी (ता. पारनेर) येथे झावरे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोल्हापूरी पध्दतीच्या बंधाऱ्याकरीता 20 लाख रूपये मंजूर झाले. त्याचे भुमिपुजन झावरे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड आझाद ठुबे होते. भाजप तालुकाध्यक्ष वसंत चेडे, अश्विनी थोरात, गंगाराम बेलकर, सुनील थोरात, सागर मैड, लहू भालेकर, पंकज कारखिले, बाळासाहेब रेपाळे, शिवाजी औटी, विठ्ठल जाधव, उषा जाधव, सुभाष दुधाडे, सतीश पिंपरकर, सचिन ठुबे उपस्थित होते.

sujit zaware
पारनेर तालुक्यात भाजप-शिवसेना एकत्र - खासदार डाॅ.सुजय विखे 

या प्रसंगी झावरे म्हणाले, पारनेर तालुक्यात पूर्वी राजकारणातील लढाई ही वैचारिक मुद्दावर चालायची. गेले दोन वर्षांपासून राजकारणातील लढाई ही वैचारीक नव्हे तर वैयक्तिक झाली आहे. ही बाब समाजाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. आमचा तालुक्यातील राजकारणात लढा हा वैचारिक आहे, वैयक्तिक नव्हे.

वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून परिसरातील लोकांच्या हिताचे विधायक काम करत आहे. राजकारणाच्या वाटचालीत अनेक चढ-उतार सुरू असतात मात्र विकास आणि समाजहित साधून राजकारण करण्याला मी पहिली पसंती दिली आणि त्यावर आग्रही राहिलो, असे सुजित झावरे यांनी सांगितले.

sujit zaware
नीलेश लंके म्हणाले, समाजकारणासाठी राजकारण प्रभावी माध्यम

जिल्ह्यातील राजकीय वाद

जिल्ह्यात आता लवकरच नगरपरिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, सहकारी संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापू लागले आहे. राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत. या आरोप-प्रत्यारोपात मर्यादा उलटून टीका होत आहे. टीकांची ही खालावलेली पातळी राजकारणाला कलंक ठरत आहे. अशा वेळी सुजित झावरेनी केलेले वक्तव्य निश्चितच राजकीय धुरंधरांना अंजन घालणारे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com