''...तर ठाकरे-शिंदे एकत्र यायला वेळ लागणार नाही!''; शिंदे गटातील नेत्याचं मोठं विधान

Deepak Kesarkar to Uddhav Thackeray : '' कटूता कमी करणं उद्धव ठाकरेंच्याच हातात..''
Uddhav Thackeray-Eknath Shinde Latest News
Uddhav Thackeray-Eknath Shinde Latest NewsSarkarnama

Deepak Kesarkar to Uddhav Thackeray : उध्दव ठाकरेंना आव्हान देत एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार शिवसेनेतून बाहेर पडले होते. यानंतर ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा तर द्यावा लागला शिवाय महाविकास आघाडीला सत्ताही गमवावी लागली. शिंदेंनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यानंतर आजपर्यंत ठाकरे आणि शिंदे यांच्यात विस्तव देखील जात नाही. पण आता शिंदेगटाच्या नेत्यानं एक खळबळजनक दावा केला आहे.

शिंदेगटाचे नेते आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी नववर्षाच्या सुरुवातीला शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. केसरकरांनी यावेळी ठाकरे गट व शिंदे गटाच्या पुन्हा एकत्रित येण्याची शक्यता वर्तविली.

केसरकर म्हणाले, आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे लोक आहोत. बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी लोकं सहजासहजी सोडून जात नाहीत. त्यामुळे काहीतरी निश्चितपणे असं घडलेलं आहे, ज्यामुळे लोक नाराज झाली आणि बाहेर पडली. ती गोष्ट नेमकी काय घडली याचं आत्मपरीक्षण जसं मी केलं तसं उद्धव ठाकरे यांनीही आत्मपरीक्षण करावं. जर त्यांनी आत्मपरीक्षण केलं तर शिवसेना एकसंध व्हायला वेळ लागणार नाही असं केसरकर म्हणाले.

Uddhav Thackeray-Eknath Shinde Latest News
Urfi Javed Case : चित्रा वाघ संतापल्या; उर्फीविरोधात थेट पोलीस आयुक्तांकडेच केली तक्रार...

तसेच हिवाळी अधिवेशनातील उध्दव ठाकरेंच्या धावत्या भेटीवरही केसरकरांनी भाष्य केले. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला आदर आहे. कटूता कमी करणं त्यांच्या हातात आहे. त्यांचा आदर ठेवणारा मी मनुष्य आहे. उद्धव ठाकरे भेटले तेव्हा मी त्यांना काहीच उत्तर दिलेले नव्हते. जेव्हा घर पेटतं तेव्हा अगोदर आग विझवावी लागते असं मी त्यांना सांगितलं. पण त्यांनी ऐकलं नाही. मात्र टीव्हीवर जे दाखवण्यात आलं त्याचं दु:ख वाटलं असंही केसरकरांनी यावेळी सांगितले.

Uddhav Thackeray-Eknath Shinde Latest News
Abhijit Bichukale: "महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री!"; बिचुकले पत्नीला असं का म्हणाले?

पैशाने प्रेम विकत घेता येत नाही. शिंदेंनी आमदारांची मनं जिंकली. त्यामुळे आम्ही सर्व त्यांच्यासोबत गेलो असं काय घडलं की, आम्ही त्यांच्याबरोबर गेलो याचं उत्तरही आम्ही वेळ आल्यावर देऊ. ते काय घडलं याचं आत्मपरीक्षण ठाकरेंनी करावं असे केसरकर म्हणाले.

'' विरोधी पक्षनेता कसा असावा तर अजितदादांसारखा..''

अजित पवार निर्मळ मनाचं व्यक्तिमत्व आहे. ते बाहेरून कठोर वाटत असले तरी त्यांचं मन निर्मळ आहे. बोलताना फटकळ बोलतात, मात्र विरोधी पक्षनेता कसा असावा तर अजीतदादांसारखा असावा, असं वाटतं. जसा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आम्हाला अभिमान आहे. तसाच विरोधी पक्षनेते म्हणून अजितदादांचा आम्हाला अभिमान आहे असंही स्तुतीसुमनं केसरकरांनी अजित पवारांवर उधळली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in