राहिबाई पोपेरे यांचे काम सरकार राज्यभर पोचविणार : दादा भुसे

 राहिबाई पोपेरे यांचे काम सरकार राज्यभर पोचविणार : दादा भुसे

अकोले : बिजमाता राहिबाई पोपेरे यांच्या कामाची माहिती मुख्यमंत्री.उद्धव ठाकरे यांना देवून शासनाच्या वतीने पोपेरे यांचे काम राज्यभर पोहचविण्याचे काम सरकार करेल, अशी ग्वाही कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली. 

कृषीमंत्री दादा भुसे यांनी आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर अकोले तालुक्‍यातील कोंभाळणे या गावात राहीबाई पोपेरे यांच्या बिजशाळेला भेट देवून पोपेरे यांचा सत्कार केला.

भुसे म्हणाले, आज छञपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, महाराज रयतेचे व शेतकऱ्यांचे रक्षक होते. आज महाराजांच्या जयंतीच्या मुहूर्तावर आपण अकोले तालुक्‍यातील कोंभाळणे येथे बीजमाता राहीबाई पोपेरे यांना भेटून त्याची बीज बॅक पाहुन त्याचे कामाची माहिती घेण्यासाठी आलो होतो. बीजमाता पोपेरे यांचे शेतकऱ्यांसाठी मोठे काम आहे. 

या सर्व कामाची माहिती आपण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणार आहोत. पोपेरे यांचे काम राज्यातील प्रत्येक गाव-वाडीपर्यत संपूर्ण महाराष्ट्रात पोचविण्यासाठी आपले महाआघाडी सरकार प्रयत्न करेल, असा विश्वासही भुसे यांनी व्यक्त केला. या वेळी भुसे यांनी पोपेरे दांपत्यासह बायफचे जतिन साठे यांचा सत्कार केला. 

या वेळी सिन्नरचे माजी आमदार.राजाभाऊ वाजे, नाशिक परिषदेचे माजी अध्यक्ष अध्यक्ष नाशिक उदय सांगळे उपस्थित होते. या वेळी भुसे यांनी पोपेरे यांची नवीन व जुन्या बायाणे बॅंकेची पाहणी केली. 

अकोले तालुक्‍याचा दुहेरी सन्मान 
अकोले तालुक्‍याने पद्मश्री व महाराष्ट्र केसरी असा दुहेरी सन्मान मिळवला आहे. त्यामुळे अकोले तालुक्‍यासाठी काय करणार हे सांगण्यापेक्षा कृतीतुनच आपले सरकार दाखवून देईल, असा विश्वास कार्यकर्त्याना मंत्री भुसे यांनी दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com