काँग्रेसचा आगामी निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा

अहमदनगर ( Ahmednagar ) जिल्ह्यात आता जिल्हा परिषद ( zp ), पंचायत समिती, बाजार समिती, स्थानिक स्वराज्य संस्था आदी निवडणुकीची ( elections ) तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे.
While felicitating Balasaheb Salunke, Dr. Dnyandev Wafare along with Amol Phadke etc.
While felicitating Balasaheb Salunke, Dr. Dnyandev Wafare along with Amol Phadke etc.sachin satpute

शेवगाव : अहमदनगर जिल्ह्यात आता जिल्हा परिषद पंचायत समिती बाजार समिती स्थानिक स्वराज्य संस्था आदी निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. यातच शेवगाव येथील आगामी निवडणुकांत काँग्रेसची भूमिका ठरविण्यासाठी शेवगाव येथे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार डाँ. सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या सूचनेनुसार अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, जिल्हा बँकेचे संचलाक गणपतराव सांगळे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, अनुसुचित सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, नगरपरिषद निरीक्षक कार्लस साठे यांच्या प्रमुख उपस्थित काँग्रेस पक्षाची बैठक झाली. Congress's slogan of self-reliance for the upcoming elections

बैठकीत साळुंके म्हणाले, शेवगाव तालुक्यातील नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणूक काँग्रेस पक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ताकदीने स्वबळावर लढविणार आहे.

काँग्रेस पक्षाची ताकद दाखवून देण्याची हीच वेळ असून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी सज्ज व्हावे. या निवडणुकीमध्ये सक्षम उमेदवार देवून ते निवडुन आण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याजी गरज आहे, असे साळुंके यांनी सांगितले.

While felicitating Balasaheb Salunke, Dr. Dnyandev Wafare along with Amol Phadke etc.
शेवगाव तालुक्यात जनावरे गेली वाहून : सुमारे 40 कुटुंबांना पाण्याचा वेढा

वाफारे यांनी तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना बुथ बांधणी, आगामी नगरपरिषद व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवणुकासंदर्भात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विविध सूचना दिल्या काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. अमोल फडके यांनी बुथ बांधणी संदर्भात सुरु असलेल्या कामकाजाचा उपस्थितांसमोर आढावा मांडण्यात आला.

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश भोसले, युवा अध्यक्ष बब्रू वडघणे, शहराध्यक्ष किशोर कापरे, प्रकाश तुजारे, सुधीर बाबर, मळेगावचे मादी सरपंच रघुनाथ सातपुते, गणेश शिरसागर, राजू शेळके, सुरेश निकाळजे, दशरथ धावणे, निजाम पटेल, महेश काटे, समीर काझी, अमोल दहिफळे, सोपान घोरतळे, योगेश भोसले, बाळासाहेब शिंगाडे, अक्षय केदार, जब्बार शेख, स्वप्निल सुपारे, रामचंद्र मिसाळ आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com