श्रीगोंदे नगरपालिकेत भाजपचा गड आला, पण सिंह गेला

श्रीगोंदे नगरपालिकेच्या नगराध्यक्षपद व आघाडीच्या १९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी होऊन बाजपला ११ जागा मिळाल्या, पण त्यांनी नगराध्यक्षपद गमावले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ८ जागा मिळाल्या असून, नगराध्यक्षपद त्यांना मिळाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला गड आला, पण सिंह गेला, अशीच अवस्था झाली आहे.
श्रीगोंदे नगरपालिकेत भाजपचा गड आला, पण सिंह गेला

श्रीगोंदे (नगर) : श्रीगोंदे नगरपालिकेच्या नगराध्यक्षपद व आघाडीच्या १९ जागांसाठी झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी होऊन बाजपला ११ जागा मिळाल्या, पण त्यांनी नगराध्यक्षपद गमावले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ८ जागा मिळाल्या असून, नगराध्यक्षपद त्यांना मिळाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला गड आला, पण सिंह गेला, अशीच अवस्था झाली आहे.

या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या आघाडीच्या उमेदवार शुभांगी पोटे यांनी दणदणीत विजय मिळविला. त्यांनी भाजपच्या सुनीता शिंदे यांचा २१०० मतांनी पराभव केला. त्यानंतर लगेचच अंतीम निकालही हाती आला.

विजयी उमेदवार-
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी :  संगीता मखरे, राजू लोखंडे, गणेश भोस, मनोहर पोटे, सोनल घोडके, निसार बेपारी, सीमा गोरे, संतोष कोथिंबिरे
भाजप : सुनीता खेतमालीस, दीपाली औटी, संग्राम घोडके, वनिता क्षीरसागर, मनीषा वाळके, शहाजी खेतमाळीस, अशोक खेंडके, मनीषा लांडे, ज्योती खेडकर, रमेश लाढाणे, छाया गोरे

एकूण जागा - १९
आघाडी- ८
भाजप - ११

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com