Ram Satpute : '' प्राजक्त तनपुरे मटक्यावाले, वाळुमाफिया आणि ख्रिश्चन मिशनरींचे हस्तक...?''; राम सातपुतेंचा घणाघात

Ram Satpute : भाड्याने आणलेल्या गर्दीला हे सरकार भीक घालणार नाही....
Ram Satpute, Prajakta Tanpure
Ram Satpute, Prajakta TanpureSarkarnama

Ram Satpute On Prajakt Tanpure : राहुरी शहरातील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची राज्य शासनाने तडकाफडकी बदली केली आहे. त्याच्या निषेधार्थ तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांच्या व विविध संघटनांच्या वतीने शासनाच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राहुरीकर एका चांगल्या अधिकाऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही. या जनक्षोभाची शासनाने दखल घेऊन प्रताप दराडे यांची करण्यात आलेली बदली रद्द करावी अशी मागणी केली होती. या मागणीनंतर भाजप आमदार राम सातपुते (Ram Satpute ) यांनी तनपुरेंवर घणाघाती टीका केली आहे.

Ram Satpute, Prajakta Tanpure
सरपंचपदाला पराभूत होऊनही उमेदवाराचा सत्कार; गावकऱ्यांनी दिली तब्बल ३१ लाखांची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या तडकाफडकी बदली विरोधात आंदोलन छेडले होते. यावेळी दराडे यांनी अनेक गुन्ह्यांचे तपासही अल्पावधीत पूर्ण केले होते असे असतानाही कथित प्रकरणांवरून कोणतीही चौकशी न करता शासनाने त्यांची बदली केली. हे योग्य नाही. या बदलीच्या निषेधार्थ राहुरी येथे रस्ता रोको आंदोलनात हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले. तसेच दराडे यांना पाठिंबा दर्शवला. या आंदोलनासंबंधीचे टि्वट तनपुरेे यांनी केले होते. याच टि्वटला आता आमदार राम सातपुते यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Ram Satpute, Prajakta Tanpure
Eknath Shinde : एका आमदारामुळे शिंदे सरकार धोक्यात ? ; कोश्यारींच्या निर्णयाकडे लक्ष

सातपुते टि्वटमध्ये म्हणतात, तनपुरे, मटक्यावाले, वाळुमाफिया आणि ख्रिश्चन मिशनरींचे हस्तक यांना घेऊन काढलेला मोर्चा जनक्षोभ कसा? असा सवाल उपस्थित करतानाच थोडं थांबा तनपुरे २०२४ ला राहुरी मतदारसंघातला हिंदू तुमच्या विरोधात नक्कीच हिंदू एकता दाखवेल. असल्या भाड्याने आणलेल्या गर्दीला हे सरकार भीक घालणार नाही अशी टीका देखील केली आहे. तसेच सातपुते यांनी तनपुरेंचा उल्लेख हिंदूविरोधी म्हणून केला आहे.

दराडे यांच्या कार्यकाळात राहुरीतील गुन्ह्यांच्या प्रमाणात घट

राहुरीकर एका चांगल्या अधिकाऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही. या जनक्षोभाची शासनाने दखल घेऊन प्रताप दराडे यांची करण्यात आलेली बदली रद्द करावी अशी मागणी प्राजक्त तनपुरे यांनी केली होती. या आंदोनाला माता भगिनींनी लक्षणीय उपस्थिती दर्शविली. दराडे यांच्या कार्यकाळात राहुरीतील गुन्ह्यांच्या प्रमाणात घट झाली होती. विशेषतः महिलांनी त्यांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले आहे. तरूण मुलींच्या छेडछाडीचे प्रकार कमी करण्यासाठी त्यांनी प्रभावी मोहिम राबवलेली होती असं प्राजक्त तनपुरे म्हणाले आहेत.

...म्हणून पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी बदली?

राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे गेल्या काही महिन्यांपूर्वी धर्मांतराचं एक प्रकरण घडले होते. मात्र, स्थानिक पोलिसांनी यात हलगर्जीपणा आणि दिरंगाई केल्याचं आरोप नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी तारांकित प्रश्‍न उपस्थित केला. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांमार्फत 15 दिवसांत चौकशी केली जाईल. तोपर्यंत राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची आजच नियंत्रण कक्षात बदली करण्यात येईल, असं प्रभारी गृहमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत जाहीर केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com