आशुतोष काळेंना शिर्डीचे अध्यक्षपद लाभेना : आता अधिकारही गोठवले...

शिर्डी देवस्थान ( shirdi ) हे महाराष्ट्रातील ( maharashtra ) सर्वात श्रीमंत देवस्थान आहे.
shirdi
shirdisarkarnama

अहमदनगर : आंध्रप्रदेशच्या तिरूपती देवस्थान पाठोपाठ शिर्डी देवस्थानची नुतन कार्यकारिणी जाहीर झाले. महाराष्ट्र सरकारने राजपत्र काढून ही कार्यकारिणी जाहीर केली. शिर्डी देवस्थान ( shirdi ) हे महाराष्ट्रातील ( maharashtra ) सर्वात श्रीमंत देवस्थान आहे. या देवस्थानवर आपला अध्यक्ष असावा अशी महाराष्ट्रातील सर्व मोठ्या पक्षांची इच्छा असते. यंदा हे अध्यक्षपद पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या पारड्यात पडले आहे. राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांना शिर्डी संस्थानचे अध्यक्षपद मिळाले खरं मात्र त्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच त्यांना कोरोना झाला. आणि आता तर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नवनियुक्त विश्वसांचे अधिकार गोठविले आहेत.

या कार्यकारिणीत एकूण 17 सदस्य असतात. यातील 11 सदस्य अशासकीय निवडी आज जाहीर करण्यात आल्या. यातील शिर्डी नगर परिषदेचे अध्यक्ष हे पदसिद्ध सदस्य असतात. 11 जणांपैकी तीन अभियंते, दोन विधी तज्ज्ञ, एक महिला व पाच सर्वसाधारण सदस्य असतात. यातील अभियंते म्हणून आमदार आशुतोष काळे, अविनाश दंडवते, सचिन गुजर, विधी तज्ज्ञ म्हणून जगदिश सावंत व सुहास अहेर, महिला म्हणून अनुराधा आदिक तर सर्वसाधारण गटातून राहुल कनाल, सुरेश वाबळे, जयवंतराव जाधव, महेंद्र शेळके व एकनाथ गोंदकर यांची निवड जाहीर करण्यात आली. आमदार काळे यांना अध्यक्षपद तर अॅड. जगदिश सावंत यांना उपाध्यक्षपद देण्यात आले आहे.

shirdi
आमदार आशुतोष काळे यांना कोरोनाची लागण

न्यायालयाची परवानगी न घेता शिर्डी संस्थानचे विश्वस्त मंडळ राज्य सरकारने जाहीर केल्याचा आरोप ठेवत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी सुरू आहे. यात आज औरंगाबाद खंडपीठाने शिर्डी संस्थानचे नवनियुक्त विश्वस्त मंडळाचे अधिकार गोठविण्याचा आदेश दिला आहे. पुढील सुनावणी चार दिवसांनी होणार आहे.यातच औरंगाबाद खंडपीठाकडून हा निर्णय आल्यामुळे नवनियुक्त विश्वस्त मंडळाच्या भवितव्यावरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

महाविकास आघाडीचा वरचष्मा

राज्य सरकारकडून शिर्डी देवस्थानवर 11 अशासकीय सदस्य नियुक्त केले आहेत. त्यात राष्ट्रवादीचे 5, काँग्रेस 4 आणि शिवसेनेचे 2 सदस्य आहेत. अजूनही सहा सदस्यांच्या निवडी जाहीर होणे बाकी आहे. यात शिवसेनेचे 3, राष्ट्रवादी 1 आणि काँग्रेसचे 2 सदस्यांची नियुक्ती बाकी आहे. या सहा सदस्यांच्या नावाची घोषणा पुढील आठवडाभरात होण्याची शक्यता आहे. यात आमदार आशुतोष काळे यांच्यासह अनुराधा आदिक, सुरेश वाबळे, जयवंत जाधव, महेंद्र शेळके हे राष्ट्रवादीचे, जगदीश सावंत व राहुल कनाल हे शिवसेनेचे तर सचिन गुजर, एकनाथ गोंदकर, सुहास आहेर, अविनाश दंडवते हे काँग्रेसचे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com