Ashok Bhangare Passed Away: राष्ट्रवादीचे नेते व अगस्ती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक भांगरे यांचं निधन

Ashok Bhangare News: माजी मंत्री व भाजप नेते मधुकर पिचड यांचे पारंपरिक विरोधक...
Ashok Bhangare , Ncp
Ashok Bhangare , Ncp Sarkarnama

Ashok Bhangare Passed away : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष अशोक यशवंतराव भांगरे यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. गुरुवारी( दि.१२) रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. संयमी व सर्वांशी सलोख्यानं वागणं हा त्यांचा स्वभाव होता. अकोले पंचायत समितीचं सभापती, समाजकल्याण समितीचं सभापती व जिल्हा परिषद अध्यक्ष यांसारखी विविध पदं त्यांनी भूषविली होती.

Ashok Bhangare , Ncp
Nana Patole : सत्यजित तांबेंच्या अपक्ष उमेदवारीनंतर कॉंग्रेसचा मोठा निर्णय

अशोक भांगरे (Ashok Bhangare) यांना त्रास जाणवू लागल्यानं त्यांना सायंकाळी शेंडी येथून एसएमबीटी हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं होतं.मात्र, उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. भांगरे यांच्या निधनाची बातमी समजताच अकोले तालुक्यात सर्वत्र शोककळा पसरली.

त्यांच्या पश्चात पत्नी सुनीता, दोन विवाहित मुली, मुलगा जिल्हा बँकेचे संचालक अमित, बंधू दिलीप असा मोठा परिवार आहे. भांगरे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Ashok Bhangare , Ncp
Pune Crime News : अजितदादांनी हिवाळी अधिवेशनात मांडलेल्या प्रस्तावाची दखल ; १३ जणांवर कारवाई

माजी मंत्री व भाजप नेते मधुकरराव पिचड (Madhuar Pichad) यांचे पारंपरिक विरोधक म्हणून भांगरे यांच्याकडे पाहिलं जात होतं. त्यांनी पिचड यांच्याविरोधात सलग पाच विधानसभा निवडणुका लढवल्या,पण त्यात पराभवाला सामोरं जावं लागलं.

पंचायत समिती सदस्य सभापती, समाज कल्याण, जिल्हा परिषद, समाज कल्याण समितीचे सभापती, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अशा विविध पदांची जबाबदारी अशोक भांगरे यांनी सांभाळली होती. संयमी व सर्वांशी सलोख्याने वागणे हा त्यांचा स्वभाव होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in