सिताराम गायकरांचे धोतर फेडणार : अजित पवार

अजित पवारांचे भाषण चालू असताना खाली बसलेल्या लोकांमधुन गायकर विषयी बोला, काय करणार, अशी मागणी झाली.
सिताराम गायकरांचे धोतर फेडणार : अजित पवार

अकोले  (नगर) : तुम्ही घड्याळाचे बटन दाबा. सत्ता आल्यावर सिताराम गायकरांचे धोतर फेडले नाही, तर नावाचा अजित पवार नाही, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

गेल्या काही दिवसांपुर्वी राज्यात नाट्यमय घडामोडी होऊन माजी मंत्री मधुकर पिचड व वैभव पिचड यांच्याबरोबर जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर हेही राष्ट्रवादी सोडून भारतीय जनता पक्षात गेले. तालुक्यात पिचड यांच्यानंतर अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून गायकर यांची प्रतिमा होती. पवारांमुळे गायकर महानंद दुध संघावर संचालक व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष झाले होते. तरीही गायकर यांनी पवारांना सोडून भाजपात प्रवेश केल्याने आज सभेत अजित पवारांचे भाषण चालू असताना खाली बसलेल्या लोकांमधुन गायकर विषयी बोला, काय करणार, अशी मागणी झाल्यानंतर पवार म्हणाले, तुम्ही घडाळाला मतदान करा. सत्ता आल्यावर गायकरांचे धोतर फेडले नाही, तर नावाचा अजित पवार नाही. काय कमी केले होते, जिल्हा परिषदेत दोन सदस्य असताना महत्वाचे सभापती पद दिले. गेली चार वर्षे जिल्हा बॅकेचे अध्यक्षपद दिले, काय कमी केले होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com