भाजपच्या बड्या नेत्याने केली पवारांच्या कामांची स्तुती ; राणेंची झाली गोची

Sharad Pawar : शरद पवार यांचे नाव ऐकले तरी उर्जा येते
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

श्रीगोंदे (नगर) : "सत्ता असो वा नसो, शरद पवार यांचा हात विकास कामात कुणीही धरणार नाही. त्यांच्याकडे पाहूनच उर्जा मिळते. साहेब म्हणजे शब्द पाळणारे नेते आहेत," अशा शब्दात आज भाजपाचे जेष्ठ नेते, श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी पवारांचे कौतुक केले.

काष्टी (ता. श्रीगोंदे) येथे आज दत्तात्रेय गावडे यांच्या महेश्वर मल्टीस्टेटच्या नव्या इमारतीचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे नेते घनशाम शेलार होते. व्यासपीठावर आमदार अशोक पवार, आमदार निलेश लंके, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, राहूल जगताप, यांच्यासह काकासाहेब कोयटे, राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस, राजेंद्र फाळके, बाळासाहेब नाहाटा, अण्णासाहेब शेलार, राकेश पाचपुते, दिपक भोसले, अप्पासाहेब पवार उपस्थितीत होते.

आमदार बबनराव पाचपुते हे राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर ते भाजपात गेले. सध्या ते भाजपाचे आमदार आहेत. पाचपुते राष्ट्रवादीत होते त्यावेळी शरद पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जात होते. आज बोलताना पाचपुते यांनी पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. ते म्हणाले, पावसामुळे आज साहेब येणार की नाही याबद्दल शंका होती. मात्र साहेब हे दिलेला शब्द पाळणारे नेते आहेत. त्यांचे काम सर्वांना प्रेरणादायी आहे. त्यांच्यामुळे झालेल्या विकासकामांची यादी वाचायला वेळ पुरणार नाही, एवढे त्यांचे मोठे काम आहे.

Sharad Pawar
अमोल कोल्हेंचा केंद्रीय मंत्र्यांवर पलटवार; 'तुमच्या जिल्ह्यातील शाळा अगोदर सुधारा'

कोरोना व त्यानंतरच्या आपल्या आजारापणावर बोलताना पाचपुते म्हणाले, मला आजाराने गाठल्यावर डाॅक्टर म्हणाले पवार साहेबांकडे पहा ते आजाराला कधीच घाबरले नाहीत, तुम्हीही तसेच निर्धास्त रहा. डाॅक्टरांचे साहेबांबद्दलचे बोल ऐकले आणि लगेच उर्जा आली. शरद पवार यांचे नाव ऐकले तरी उर्जा येते. महाराष्ट्र व देशाला घडविणारा नेता अशी त्यांची ख्याती असून कृषीमंत्री असताना त्यांनी केलेले काम नेता कसा असावा, हे दाखविण्यासाठी पुरसे असल्याचेही पाचपुते म्हणाले.

दरम्यान, कालच भाजपचे केंद्रीय मंत्री व जेष्ठ नेते नारायण राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. राणे म्हणाले होते की, अडीच वर्षांत शरद पवारांच्या तीन पक्षांच्या राजवटीत उद्योगाला पोषक वातावरण नव्हतं, म्हणून इथून उद्योग गेले आहेत. उद्योग गेल्यानंतर हात चोळत बसण्यात अर्थ नाही. पवार हे चार वेळा मुख्यमंत्री होते. एवढ्या काळात औद्योगिक क्रांती झाली असती. पण ती का नाही झाली?” असा सवाल उपस्थित करत पवारांना लक्ष्य केले होते. मात्र आता भाजपच्याच वरिष्ठ नेत्याने शरद पवारांवर स्तुतीसुमने उधळल्याने राणे यांच पुरती गोची झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com