कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात उत्साह, भाजपची खलबते  - nagar zp president election ncp congress happy bjp sad | Politics Marathi News - Sarkarnama

कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या गोटात उत्साह, भाजपची खलबते 

मुरलीधर कराळे 
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

नगर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू असताना महाविकास आघाडीच्या वतीने अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचे उमेदवार बैठकित जाहीर करण्यात आले, तर दुसरीकडे माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या कार्यालयात भाजपच्या नेत्यांनी गळ्यात गळे घातले. निवड प्रक्रियेत सहभाग घेऊन उपयोगच नसल्याने त्याबाबत खलबते सुरू होते. 

आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, माजी मंत्री राम शिंदे, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, सदाशिव पाचपुते, यांची बैठक शिंदे यांच्या कार्यालयात सुरू होती.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवड प्रक्रियेत नेमका काय भूमिका घ्यायची,याबाबत खलबते सुरू होते. जिल्हा परिषदेत मात्र महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर करून जल्लोषही सुरू केला असून, विरोधक भाजपच्या वतीने अद्यापही कोणत्याही हालचाली दिसून आल्या नाहीत. 

जिल्हा परिषदेच्या निवडीबाबत भाजपची मागील दोन दिवसांपूर्वीही बैठक झाली होती. त्यामध्ये आपण उमेदवार देणार असल्याचे कोअर कमिटीच्या बैठकित ठरले होते, तथापि, उमेदवार हा कमळाच्या चिन्हावरच निवडून आलेला असावा, अशी भूमिका कर्डिले यांनी घेतली होती. 

त्यामुळे शालिनी विखे यांना संधी मिळणार नसल्याचे त्याच वेळी अप्रत्यक्षरित्या जाहीर झाले होते. विखे पाटील यांना संधी मिळणार नसल्याने भाजपही निवडीपासून अलिप्त राहण्याची शक्‍यता राजकीय धुरिणांमधून व्यक्त केली जात होती. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख