बाहेरील व्यक्तींनी शिर्डीचे वातावरण गढूळ करू नये : विखे पाटील - Outsiders should not disturb the atmosphere of Shirdi: Vikhe Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूरग्रस्तांना तातडीची मदत; घरात पाणी शिरलेल्यांना १० हजार, अन्न धान्याचे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपय मिळणार. वडेट्टीवार यांची घोषणा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन पुरग्रस्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत दिली.

बाहेरील व्यक्तींनी शिर्डीचे वातावरण गढूळ करू नये : विखे पाटील

सतीश वैजापूरकर
गुरुवार, 10 डिसेंबर 2020
बाहेरील व्यक्तींनी त्यात हस्तक्षेप करून वातावरण गढूळ करू नये, अशा शब्दात आमदार विखे पाटील यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.

शिर्डी : साईसंस्थानने फलकाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. ग्रामस्थांनी व साईसंस्थानने एकत्र बसून निर्णय घ्यावा. आपण ग्रामस्थांसोबत आहोत. बाहेरील व्यक्तींनी त्यात हस्तक्षेप करून वातावरण गढूळ करू नये, अशा शब्दात आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.

साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी सभ्य पोषाख करून यावे, अशा आशयाचे विनंती फलक साईसंस्थानने लावले. त्यास भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आक्षेप घेतल्याने वादंग निर्माण झाले. त्यांच्या विरोधात शिवसेना व मनसेची महिला आघाडी आणि ब्राम्हण महासंघाने या वादात उडी घेतली. आज काही ग्रामस्थांनी देखील ठिकठिकाणी लावण्यासाठी हे फलक तयार केले. त्यातील एक फलक फडकावून आमदार विखे पाटील यांनी ग्रामस्थांच्या भुमिकेस आपला पाठिंबा असल्याचे जाहिर केले.

आता बऱ्याच ठिकाणी असे फलक लावण्यात येणार असल्याने नेमका कुणाच्या फलकावर आक्षेप घ्यायचा, असा प्रश्न देसाई यांच्यासमोर निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्यापूर्वी त्यांनी नगरपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांनी तयार केलेला एक विनंती फलक त्यांनी हातात धरून फडकविला. या फलकावर साई दर्शनासाठी येताना भाविकांनी भारतीय संस्कृतीला अनुसरून किंवा सभ्य पोषाख करून यावे, अशी विनंती करणारा मजकुर होता. या वेळी भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, नगरसेवक अभय शेळके, नितीन कोते यांच्यासह विवीध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

काल जाहिर केल्याप्रमाणे मनसेच्या महिला आघाडीच्या प्रमुख सुरेखा दत्तात्रेय कोते यांनी अशा आशयाचे दहा फलक तयार करून ते शहरात ठिकठिकाणी लावले. उद्या आम्ही शहराबाहेरील स्वागत कमानीवर हा मजकुर असलेला मोठा फलक लावणार आहोत. देसाई यांनी आमचे फलक येथे येऊन हटवून दाखवावेत, असे आव्हान त्यांनी दिले.

ग्रामस्थ व मनसे यांच्यावतीने शहरात ठिकठिकाणी असे फलक लावले जाणार आहेत. त्यामुळे साईसंस्थानचे विनंती फलक हटविण्यासाठी देसाई येथे आल्या. तर त्यांना संस्थानबरोबरच ग्रामस्थांच्या फलकांच्या विरोधात देखील भुमिका घ्यावी लागेल.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख