'कुत्री भुंकतात'च्या वक्तव्यावरून इंदुरीकर महाराजांवर चित्रा वाघ भडकल्या!

निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी रविवारी देवरे व लंके यांच्यातील वादात उडी घेतली.
Chira Wagh slams Nivrutti Maharaj Indurikar over support to Nilesh Lanke
Chira Wagh slams Nivrutti Maharaj Indurikar over support to Nilesh Lanke

मुंबई : कितीही कुत्री भुंकली तर हत्ती चालत राहतो. अगदी तसंच आमदार नीलेश लंके तुम्हीही विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून वाटचाल करीत रहा, असं म्हणत लंके यांची पाठराखण करणाऱ्या निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी धारेवर धरलं आहे. महिलांना छळायची शिकवण देताय का, असा सवाल वाघ यांनी इंदुरीकर यांना केला आहे. (Chira Wagh slams Nivrutti Maharaj Indurikar over support to Nilesh Lanke)

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या एका ऑडिओ क्लिपमुळे राज्यात खळबळ उडाली असून पारनेरच्या लोकप्रतिनिधीच्या व्यापाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी या क्लिपमध्ये दिला होता. यात त्यांनी कोणत्याही लोकप्रतिनिधीचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख हा तेथील आमदार निलेश लंके यांच्यावर असल्याचे त्यांनी वर्णन केलेल्या प्रसंगातून दिसून येते. हे प्रकरण राज्यभर गाजत असताना निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी रविवारी या वादात उडी घेतली.  

श्रावण मासा निमित्त नगरमधील भाळवणी येथील कोविड सेंटरमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहाच्या पाचव्या दिवशी इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन झाले. यावेळी बोलताना इंदुरीकर यांनी आपल्या विनोदी शैलीतून लंके यांचे कौतुक केले. निलेश लंके यांनी उभारलेल्या या कोरोना सेंटरच्या माध्यामातून हजारो कोरोना रूग्ण कोणताही खर्च न करता बरे होऊन घरी गेले आहे. या हजारो गोरगरीब रूग्णांचे आर्शीर्वाद लंके यांना लाभले आहेत. त्यामुळे लंके आगामी 25 वर्ष आमदार राहतील, असे निवृत्ती महाराज इंदुरीकर म्हणाले होते.

तसेच कितीही कुत्री भुंकली तर हत्ती चालत राहतो. अगदी तसंच आमदार नीलेश लंके तुम्हीही विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून वाटचाल करीत रहा,' असं वक्तव्यही इंदुरीकर यांनी केलं होतं. त्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. चित्रा वाघ यांनी इंदुरीकर यांच्यावर निशाणा साधला आहे. वाघ यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. 

'राज्यातील भोळ्या भाबड्या भगिनी मन लावून ज्यांचं किर्तन ऐकतात त्या ह.भ.प. नी एका महिलेचीच प्रशासकीय तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी कडून होणाऱ्या त्रासाची तुलना “कुत्री भुंकतात” अशी करणं अतिशय दुदैवी…या सत्तेतील बेलगाम घोड्यांना “हत्ती” म्हणत बळ देऊन महिलांना छळायची शिकवण देताय का??', असं ट्विट करत वाघ यांनी इंदुरीकर महाराजांना टोला लगावला आहे. 

दरम्यान, इंदुरीकर म्हणाले होते, की राज्यातील अनेक साखर सम्राट, शिक्षण सम्राट , उद्योगपती आमदार आहेत. परंतु कुणालाही ही संकल्पना सुचली नाही. लंके यांनी ती प्रत्यक्ष करून दाखवली. राज्यातच नव्हे तर देश विदेशातही या माणसाचा नावलौकिक झाला. तरीही आमदार नीलेश लंके हे एक सामान्य कार्यकर्ता म्हणून रुग्णांच्यामध्ये बसून कीर्तन ऐकत आहेत. या लंके यांच्या साधेपणाचे कौतुकही इंदुरीकर यांनी केले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com