विशाल कोतकर पोलिसांना जुमानेना; नार्को टेस्टची मागणी! 

केडगाव येथील शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या हत्याप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी कॉग्रेसचा नगरसेवक विशाल कोतकर याची नार्को टेस्ट करावी, असा अर्ज पोलिसांच्या वतीने न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने ही विनंती मान्य केल्यास या घटनेच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पोलिसांना मोठी मदत होणार आहे.
विशाल कोतकर पोलिसांना जुमानेना; नार्को टेस्टची मागणी! 

नगरः केडगाव येथील शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या हत्याप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी कॉग्रेसचा नगरसेवक विशाल कोतकर याची नार्को टेस्ट करावी, असा अर्ज पोलिसांच्या वतीने न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने ही विनंती मान्य केल्यास या घटनेच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पोलिसांना मोठी मदत होणार आहे. 

केडगाव येथील पोटनिवडणुकीत कॉग्रेसचा विशाल कोतकर विजयी झाला, त्याच दिवशी शिवसेनेचे केडगाव उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या झाली होती. ही हत्या करणारा मुख्य आरोपी संदीप गुंजाळ हा विशाल कोतकरच्या संपर्कात होता. तसेच विशाल कोतकरच्या सांगण्यावरूनच ही हत्या घडवून आणल्याचा आरोप संबंधितांच्या नातेवाईकांचा आहे. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांनी कोतकरला अटक केली आहे. या गुन्ह्यात कॉग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनाही अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यामागे राजकीय कनेक्‍शन कसे आहे, विशाल कोतकरबरोबरच इतर कोणते नेते या गुन्ह्याशी संबंधित आहेत, याबाबत आता सखोल चौकशी सुरू आहे. तपासाचा एक भाग म्हणून विशाल कोतकरची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी तपासी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी न्यायालयात अर्जाद्वारे केली आहे. याबाबत आता दहा मे रोजी आरोपीतर्फे म्हणणे मांडण्यात येणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com