मधुकर पिचडांना प्रतिउत्तर करणार नाही : सुजय विखे 

नगर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी जाहीर करून कॉग्रेसचे युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांना चिमटा काढला. त्याला प्रतिउत्तर देताना मात्र डॉ. विखे यांनी नमते घेत, पिचड आपल्याला वडिलधारे असून, त्यांना प्रतिउत्तर देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
मधुकर पिचडांना प्रतिउत्तर करणार नाही : सुजय विखे 

नगर : नगर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी जाहीर करून कॉग्रेसचे युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांना चिमटा काढला. त्याला प्रतिउत्तर देताना मात्र डॉ. विखे यांनी नमते घेत, पिचड आपल्याला वडिलधारे असून, त्यांना प्रतिउत्तर देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. 

नगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखे पाटील यांनी मोर्चेबांधणी केली आहे. आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला आहे. पण ते कोणत्या पक्षाकडून लढणार, हे गुलदस्त्यातच आहे. राष्ट्रवादी व कॉग्रेसच्या युतीमध्ये या जागेवर उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचा हक्क आहे. परंतु डॉ. सुजय विखे यांच्यासाठी ती कॉग्रेसला मिळावी, यासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापर्यंत प्रयत्न केल्याचे समजते. मात्र ही जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असे अजित पवार यांनी जाहीर केले. नंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यातील राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या उमेदवारी सोडणार नसल्याचे सांगितले. त्यानंतर आता पिचड यांनी आपली भूमिका विषद करताना ज्यांना उमेदवारी हवी आहे, त्यांनी राष्ट्रवादीत आधी प्रवेश करावा, मगच उमेदवारी मागावी. द्यायची की नाही, ते आम्ही ठरवू, असे सूचक वक्तव्य केल्याने डॉ. विखे यांच्या उमेदवारीविषयी पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

पिचड यांनी केलेले वक्तव्य थेट विखे यांना भिडणारे होते. असे असतानाही डॉ. सुजय विखे यांनी नुकतेच मुकुंदनगरमध्ये झालेल्या आरोग्य शिबिरात पिचड यांच्या वक्तव्यावर आपले म्हणणे मांडले. मी अजून तरी कुठल्याही पक्षाची उमेदारी माघितली नाही. पण अनेकजण मला सल्ले देतात. मधुकरराव पिचड हे आपल्याला वडीलधारे आहेत. त्यामुळे त्यांना प्रतिउत्तर करणार नाही, पण वेळ आल्यावर जनतेला जो पर्याय योग्य वाटेल, ते पर्याय जनता सुज्ञपणाने निवडल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास वाटतो, असे वक्तव्य करून त्यांनी राजकीय वाद टाळला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com