कोण आले कोण गेले यांची चिंता नाही शिवसैनिक जागेवरच- विजय औटी 

''शिवसेना पक्षाने अनेक असंख्य माणसे मोठी केली. परंतु, ते कार्यकर्ते पक्षाला सोडून गेले. त्या फितुरांची समाजामध्ये शून्य किंमत आहे. कुठल्याही राजकीय पक्षाच्या कारकिर्दीत अनेक वादळे येतात आणि जातात कोण गेले कोण आले याची चिंता करू नका माझा शिवसैनिक जागेवरच आहे आणि तो या विधानसभेच्या वेळी तो दाखवून देणार आहे असे प्रतिपादन आमदार विजय औटी यांनी येथे केले.
कोण आले कोण गेले यांची चिंता नाही शिवसैनिक जागेवरच- विजय औटी 

नगर : टाकळी ढोकेश्वर : ''शिवसेना पक्षाने अनेक असंख्य माणसे मोठी केली. परंतु, ते कार्यकर्ते पक्षाला सोडून गेले. त्या फितुरांची समाजामध्ये शून्य किंमत आहे. कुठल्याही राजकीय पक्षाच्या कारकिर्दीत अनेक वादळे येतात आणि जातात कोण गेले कोण आले याची चिंता करू नका माझा शिवसैनिक जागेवरच आहे आणि तो या विधानसभेच्या वेळी तो दाखवून देणार आहे असे प्रतिपादन आमदार विजय औटी यांनी येथे केले.

हिवरे कोरडा(ता.पारनेर)येथे शिवसेना शाखेच्या उद्गाटन औटी यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, तालुकाप्रमुख विकास रोहकले, पोपट चौधरी, संदीप कोरडे, गणेश कोरडे, अमोल अडसूळ, बाळासाहेब अडसुळ, अमोल कोरडे आदी उपस्थित होते. औटी म्हणाले, "आपल्या पाठीमागे बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आहेत आपला मतदारसंघ हा इतिहास घडविणारा मतदारसंघ आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पारनेर तालुक्याची नवीन ओळख करून देण्याचे काम आपण पंधरा वर्षात केलं आहे आपली नाळ ही सामान्य माणसांशी जुळलेली आहे सामान्य जनतेशी आपण प्रामाणिक राहुन काम करत आहोत."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com