नगरचे माजी महापौर फुलसौंदर सेनेकडून लढणार; श्रीगोंद्याच्या शेलारांचाही पर्याय!  - nagar shivsena mp candidate | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

नगरचे माजी महापौर फुलसौंदर सेनेकडून लढणार; श्रीगोंद्याच्या शेलारांचाही पर्याय! 

मुरलीधर कराळे 
गुरुवार, 25 जानेवारी 2018

शिवसेनेने वेगळी चूल मांडण्याचे ठरविल्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून स्वबळाची तयारी सुरु आहे. उमेदवार कोण असतील, हे गुलदस्त्यात असले, तरी काही घटनांचा संदर्भ पाहता ज्येष्ठ नेते भगवानराव फुलसौंदर किंवा श्रीगोंद्यातील नेते घनश्‍याम शेलार या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळू शकते. उमेदवार कोणीही असला, तरी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मात्र याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. 

नगरः आगामी निवडणुकांत शिवसेनेने वेगळी चूल मांडण्याचे ठरविल्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून स्वबळाची तयारी सुरु आहे. उमेदवार कोण असतील, हे गुलदस्त्यात असले, तरी काही घटनांचा संदर्भ पाहता ज्येष्ठ नेते भगवानराव फुलसौंदर किंवा श्रीगोंद्यातील नेते घनश्‍याम शेलार या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळू शकते. उमेदवार कोणीही असला, तरी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मात्र याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. 

शिवसेनेचे नेते भगवान फुलसौंदर यांनी नगरचे महापौर असताना शहरात विविध कामे केली. टिळक रस्ता, बालिकाश्रम रस्ता, महालक्ष्मी उद्यान, पिण्याची टाकी अशी अनेक प्रलंबित कामे त्यांच्या काळात मार्गी लागली. त्यांचा शहरात चांगला जनसंपर्क आहे. ग्रामीण भागाशीही त्यांनी संपर्क सुरू ठेवला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात राजकीय चर्चा रंगताना फुलसौंदर यांनी आता लोकसभेसाठी तयारी सुरू करावी, असे सूचक वक्तव्य काही नेत्यांनी केले होते. 

घनश्‍याम शेलार यांनी शिवसेनेत प्रवेश करून मागील दीड वर्षांत पन्नास पेक्षा जास्त शाखा सुरू केल्या. शेलार पूर्वी भाजपमध्ये होते. 1999 च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी दंड थोपटले होते. मात्र ऐनवेळी दिलीप गांधी यांना तिकीट देण्यात देण्यात आले. त्यामुळे नाराज होऊन त्यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेथेही राजकीय भवितव्य धुसर दिसल्याने त्यांनी दीड वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. शेलार यांना शिवसेनेकडून विधानसभेचा शब्द दिल्याचे समजते. मात्र श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघातील दिग्गजांच्या लढतीपेक्षा लोकसभेची निवडणूक त्यांच्यासाठी अधिक सोयीची ठरेल, असे जाणकारांचे मत आहे. 

आता शिवसेनेची लाट : संदेश कार्ले 
मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजप-शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस केला. रोज पंधरा किलोमीटर पायी फिरून घरोघरी प्रचार केला. नगर तालुक्‍याची सर्व धुरा मी सांभाळली. शिवसेनेची संघटना आधीच तयार आहे. त्यामुळे शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार दिल्यास कार्यकर्ते अधिक जोमाने काम करतील. शिवसेनेचे कार्यकर्ते निःस्वार्थीपणे काम करतात. या उलट भाजपची स्वतंत्र अशी मोठी साखळी नाही. सध्या गावोगावी बुथप्रमुख दिले असले, पक्षातील अंतर्गत गटबाजीचा फटका संबंधित उमेदवाराला बसेल, असे मत शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी व्यक्त केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख