शिवसेनेच्या 16 कार्यकर्त्यांना अटक; अनिल राठोडांचा नंबर कधी? 

शिवसेनेच्या 16 कार्यकर्त्यांना अटक; अनिल राठोडांचा नंबर कधी? 

नगर : केडगाव येथे शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची हत्या झाल्यानंतर रास्ता रोको, दगडफेक केल्याप्रकरणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल होता. त्यातील आरोपींचे अटक सत्र सुरू असून, आज शिवसेनेचे शहरप्रमुख तथा नगरसेवक दिलीप सातपुते, विक्रम राठोड, युवा सेनेचे शहराध्यक्ष हर्षवर्धन कोतकर यांच्यासह 16 जण पोलिसांना शरण आले. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पण शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड केव्हा होणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

केडगाव हत्याकांडानंतर शिवसेनेचे नेते व पदाधिकाऱ्यांनी संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या मृतदेहाजवळ येण्यास पोलिसांना मज्जाव केला होता. आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी करीत रास्ता रोको करीत वाहनांची मोडतोड, दगडफेक केली. त्यात पोलिसांच्या गाडीचेही नुकसान झाले. या प्रकरणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. नंतर मात्र संबंधितांना पोलिसांनी अटक केली नव्हती. दरम्यान, हत्याकांडप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, भाजपचे शिवाजी कर्डिले तसेच अनेक कार्यकर्त्यांना अटक झाल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक केली जात नाही, असा आरोप होत होता. आता पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्याचे सत्र सुरू केले आहे. यापूर्वीही काही कार्यकर्ते पोलिसांना शरण गेले होते. दिलीप सातपुते, दिप खैरे, विक्रम राठोड, हर्षवर्धन कोतकर, रमेश परतानी, सुनील सातपुते, देवीदास मोढवे, मुकेश जोशी, विजय पठारे, संतोष फसले, चेमन शर्मा, विशाल गायकवाड, शुभम बेंद्रे, अनिल लालबोंद्रे, लंकेश हरबा तसेच इतर कार्यकर्त्यांनी स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी त्यांना अटक केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com