शिवाजीराव नागवडे- शंकरराव कोल्हे जोडी पाहिली की भल्याभल्यांना घाम फुटायचा!  - nagar shivajirao nagawade satkar | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

शिवाजीराव नागवडे- शंकरराव कोल्हे जोडी पाहिली की भल्याभल्यांना घाम फुटायचा! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

बाळासाहेब थोरात यांची अनुपस्थिती 
कॉग्रेसचे वरिष्ठ नेते संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. नागवडे हे थोरात यांच्या गटाचे कार्यकर्ते मानले जातात. असे असूनही थोरात यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाषणातून मात्र नागवडे यांच्या कामाचे कौतुक केले. 

नगर : भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळेच जातीय दंगलीचे विष पेरले गेले. त्याचा पहिला ट्रेलर भिमा कोरेगावमध्ये दिसला, असा आरोप करून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले सरकार आगामी काळात उलथून टाका, असे आवाहन केले. 

श्रीगोंदे येथे साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल जगताप आदींच्या उपस्थितीत झाला. या वेळी नेत्यांनी भाजपचा समाचार घेतला. 

साखर कारखानदारी कशी चालवायची, याचे परिपक्व ज्ञान नागवडे यांना आहे. त्यांनी श्रीगोंदे तालुक्‍यातील जनतेचे हित पाहिले. जनता हिच केंद्रबिंदू मानून परिसराचा विकास केला, असे गौरवोद्गार चव्हाण यांनी काढले. नागवडे हे बापु नावाने परिचित आहेत. बापुनी भल्याभल्यांना गारद केल्याचे किस्से काही नेत्यांनी सांगितले. आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत माजी खासदार दादापाटील शेळके यांनी शंकरराव कोल्हे आणि शिवाजीराव नागवडे यांची जोडी पाहिली की भल्याभल्यांना घाम फुटायचा असे सांगून श्रीगोंद्याला महाविद्यालयाला मान्यता घेताना दोघांनी तत्कालिन मुख्यमंत्र्यांना कसे फैलावर घेतले याचा किस्सा सांगितला. त्याला उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख