जन्मठेप लागलेल्या माजी महापौर संदीप कोतकरांचे नगरसेवकपद रद्द 

जन्मठेप लागलेल्या माजी महापौर संदीप कोतकरांचे नगरसेवकपद रद्द 

नगर : लांडे खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले कॉग्रेसचे माजी महापौर संदीप कोतकर यांचे नगरसेवकपद अखेर रद्द करण्यात आले आले आहे. त्यांना पुढील सहा वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. याबाबतचा आदेश आयुक्त घनश्‍याम मेंगाळे यांनी दिला. 

कोतकर यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याने महापालिकेत स्थायी समितीत कॉंग्रेसचे संख्याबळ कमी झाले आहे. फेब्रुवारीमध्ये स्थायी समितीचे पाच सदस्य निवृत्त होत आहेत. त्यामुळे हा विषय पुन्हा ऐरणीवर आला. रिक्त पदासह पक्षनिहाय संख्या बळानुसार नऊ सदस्यांची नियुक्ती होणार आहे. त्यातच कॉग्रेसचे संख्याबळ एक ने घटले आहे. त्यामुळे साहजिकच स्थायीच्या सदस्य संख्याबळावर परिणाम होणार आहे. 


खटल्याची पार्श्वभमी 

शेवगाव येथील लॉटरीविक्रेता अशोक भिमराज लांडे याचा केडगाव येथे हाणमार झाल्याने 19 मे 2008 रोजी खून करण्यात आला होता. प्रारंभी पोलिसांनी या खुनाची विशेष दखल घेतली नाही. त्यामुळे या घटनेतील साक्षीदार असलेले शंकर राऊत यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन नगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात 2013 मध्ये खुनाचा गुन्हा दाखल झाला. कॉग्रेसचे तत्कालिन शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर, त्यांचे तीनही पुत्र संदीप, सचिन व अमोल यांच्यासह 15 जणांवर दोषारोपपत्र ठेवण्यात आले होते. यातील संदीप कोतकर हे नगरचे माजी महापौर आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा खटला पुढे नाशिकच्या न्यायालयात चालविण्यात आला. एप्रिल 2016 मध्ये नाशिकचे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. कदम यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावनी झाली. त्यात सहा जणांना दोषी ठरवून भानुदास कोतकर यांच्यासह त्यांच्या तीनही मुलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. दरम्यान, संदीप कोतकर यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात यावे, अशी तक्रार काही नगरसेवकांनी केल्याने त्याची सुनावणी होऊन हा विषय आयुक्तांच्या अखत्यारित असल्याने त्यांनीच निर्णय घ्यावा, असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार आता आयुक्तांनी कोतकर यांचे नगरसेवकपद रद्द ठरविले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com