राम शिंदेंनी करुन दाखवले...कृषी महाविद्यालयाचा 'जीआर' निघाला!  - nagar ram shinde agri college | Politics Marathi News - Sarkarnama

राम शिंदेंनी करुन दाखवले...कृषी महाविद्यालयाचा 'जीआर' निघाला! 

मुरलीधर कराळे 
बुधवार, 24 जानेवारी 2018

नगर : कृषी महाविद्यालय जामखेडला की श्रीगोंद्याला या वादावर आता पडदा पडला आहे. अनेक सोपस्कर बाकी असताना महाविद्यालयाचे उदघाटन केलेच कसे, असा सवाल करून श्रीगोंदेकरांनी जनहित याचिकाही दाखल करण्याचे नियोजन केले होते. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी आपले राजकीय वजन वापरून प्रशासकीय सर्व मंजुरी मिळविली. त्याचा शासन अध्यादेशही निघाला असल्याने हे महाविद्यालय आता हळगावला होणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. 

शासन आदेशामध्ये म्हटले आहे, की शासनाने यापूर्वी शासकीय कृषी महाविद्यालयासाठी आवश्‍यक असणाऱ्या जागेसाठी उपलब्धता विचारात घेऊन हळगाव (ता. जामखेड) येथे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्याबाबत निर्णय घेतला आहे. त्यासाठी आर्थिक तरतुदही करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातच नव्हे, तर देशातील आवर्षणप्रवण व दुर्गम भागात अशी नवीन संस्था मंजूर करणे ही बाब सर्वांसाठी न्याय देणारी व विकासास पुरक ठरणारी, समतोल क्षेत्रीय विकास साध्य करणारी असल्याने या बाबींचा पुनर्विचार करून हळगावला कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गंत पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयासाठी आवश्‍यक त्या पदांसाठी उच्च स्तर समितीची मान्यता घेऊन मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. 

माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी श्रीगोंदे येथे कृषी महाविद्यालय होण्यासाठी प्रस्ताव दिला होता. मात्र पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी हे महाविद्याल त्यांच्या जामखेडला पळविले. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये निर्माण झालेला दुरावा लपून राहिला नाही. त्याचा परिणाम म्हणून पाचपुते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून दुरावले. इकडे प्रा. शिंदे यांचे वजन मात्र वरिष्ठ पातळीवर वाढले. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख