'धनगरवाडी' भाजपची, बाकी सगळे 'विखे'! 

'धनगरवाडी' भाजपची, बाकी सगळे 'विखे'! 

नगर : राहाता तालुक्‍यात विखे पाटील घराण्याचे वर्चस्व मागील चार पिढ्यांचे आहे. तेच वर्चस्व प्रत्येक निवडणुकांत सिद्ध होताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या आठपैकी सात ग्रामपंचायतीत विखे पाटील गटाची एकहाती सत्ता आली. 

राहाता तालुक्‍यात कोऱ्हाळे, वाकडी, दहेगाव, निमगाव, धनगरवाडी, दाढ बुद्रुक, दुर्गापूर, पिंपरी निर्मळ या ग्रामपंयातींसाठी निवडणूक झाली. त्यातील धनगरवाडी या एकमेवर ग्रामपंचायतीवर भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या गटाने वर्चस्व सिद्ध केले. इतर सात ग्रामपंचायतींमध्ये मात्र कॉग्रेसच नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाने बाजी मारली. कोऱ्हाळे येथे भारतीय जनता पक्षाची सत्ता संपुष्टात आणत विखे गटाने सरपंचासह सर्व सतरा जागांवर विजय मिळविला. वाकडी ग्रामपंचायतीत दहा जागा विखे गटाने, सहा जागा कोल्हे गटाने तर एक जागा आशुतोष काळे गटाने जिंकण्यात यश मिळविले. कोऱ्हाळे येथे सरपंचपदी वैशाली थोरात, दहेगाव येथे विठ्ठल डांगे, निमगाव येथे शिल्पा कातोरे, दाढ बुद्रुक येथे पूनम तांबे यांची वर्णी लागली. हे सर्वच विखे गटाचे आहेत. धनगरवाडी येथे ग्रामपंचायतीत सरपंचपदी कोल्हेसमर्थक सीताबाई आदमाने विजयी झाल्या. तेथे त्यांच्या मंडळाने दोन, तर विखे गटाने पाच जागा मिळविल्या. 

तालुक्‍यातील बहुतेक ग्रामपंयातचींच्या लढती या दोन-तीन गटांमध्ये झाल्या असल्या, तरी त्यांचे स्वरुप काट्याच्या लढती असे राहत नाही. कारण दोन्हीही गट विखे यांनाच मानणारे असल्याने संघर्षाबाबतचे निर्णय विखे यांच्या पातळीवर येतात. तेथे तडजोड होऊन वाद मिटले जातात. त्यानंतर निवडून आलेले उमेदवार एकत्र येत विखेंच्या छत्रछायेखाली येत असल्याने सर्वजण एक होतात. त्यामुळे या लढती काट्याच्या नव्हे, तर प्रेमाच्या होतात, असे चित्र निर्माण होत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com