बड्या नेत्यांच्या उपस्थितीत राम शिंदे यांच्या कन्येचा विवाह - Marriage of daughter of Ram Shinde in Pune in presence of top leaders | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

बड्या नेत्यांच्या उपस्थितीत राम शिंदे यांच्या कन्येचा विवाह

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 20 जून 2021

कोरोनामुळे उपस्थितीवर मर्य़ादा

कर्जत : माजी मंत्री प्रा राम शिंदे (Ram Shinde) यांची कन्या  डॉ. अक्षता आणि सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील बावची येथील कुंडलीक नारायण खांडेकर यांचे सुपुत्र जिल्हाधिकारी श्रीकांत यांचा शुभविवाह पुणे येथील रिट्स कार्लटन हॉटेल मध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत आज दुपारी बरोबर १२.०५ वाजता पार पडला. (Akshta Ram Shinde weds with IAS Shrikant Khandekar in Pune)

या वेळी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हजेरी लावली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमानुसार हा सोहळा पार पडला.आपल्या लाडक्या मुलीला निरोप देताना प्रा. शिंदे अत्यंत हळवे झाले होते.सायंकाळी उशिरा पर्यंत त्याच ठिकाणी स्वागत समारंभ उशिरापर्यंत सुरू होता त्यास राज्यातील अत्यंत महत्वाच्या नेते मंडळींनी उपस्थिती दर्शवली.

उपमुख्यमंत्री अजित पवार,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेक मंत्री, माजी मंत्री, खासदार, माजी खासदार, ऩेते उपस्थित होते अशी माहिती मिळाली. आज दुपारी हा लग्न सोहळा संपन्न झाला मात्र कोरोना नियमावली नुसार कुटुंबातील मोजके व पाहुणे मंडळी उपस्थित होती. कोरोनामुळे मतदारसंघातील अनेकांना इच्छा असून सुद्धा उपस्थित राहता आले नाही.

कोरोनामुळे काही उपस्थितीला मर्यादा आहेत त्या मुळे घरातूनच अक्षता टाकून माझ्या मुलीला आशीर्वाद द्या असे आवाहन प्रा राम शिंदे यांनी केले होते.काही दिवसांपूर्वी चोंडी येथे त्यांनी मुलीचा साखरपुडा केला होता. त्यास कर्जत जामखेड मतदारसंघासह राज्यातील मान्यवरांनी उपस्थित दर्शविली होती.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख