तळागाळातल्या घटकांसाठी स्व. मारुतराव घुले पाटलांनी आयुष्य खर्ची घातले 

..
Marotrao-Ghule- remembered
Marotrao-Ghule- remembered

शेवगाव :  "  सत्ता असो वा नसो तळागाळातल्या घटकांसाठी स्व. मारुतराव घुले पाटलांनी आयुष्य खर्ची करुन गोरगरीब जनतेचे प्रपंच उभे केले. त्याच संस्काराच्या शिदोरीवर नरेंद्र घुले  व चंद्रशेखर घुले  हे वाटचाल करीत आहेत.

आमदार असतांना भाऊंनी शेवगाव पाथर्डी असे भेदभाव केला नाही. जास्तीत जास्त विकासकामे करण्यासाठी दोन्ही तालुक्यात प्रामाणिक प्रयत्न केले. आता भविष्य काळातही श्रमजिवी वर्गाला प्रतिष्ठा मिळवुन देण्यासाठी प्रयत्न केले जातील. तुमची सर्व ताकद भाऊंच्या पाठीमागे उभे करावी ", असे आवाहन  पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले यांनी केले.

शेवगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लोकनेते मारुतरावजी घुले पा.ज्ञानेश्वर उदयोग समूहाचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या वाढदिवसानिमीत्त तीनशे इमारत बांधकाम कामगारांना आत्यावश्यक साहीत्य व सुरक्षा संचाचे वाटप कार्यक्रम प्रसंगी सभापती घुले बोलत होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वरचे ज्येष्ठ संचालक काकासाहेब नरवडे होते. यावेळी बाजार समितीचे सभापती अँड. अनिल मडके, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, राष्ट्रवादीचे तालु्काध्यक्ष कल्याण नेमाणे, पंचायत समितीचे सद्य कृष्णा पायघन, मंगेश थोरात, बाजार समितीचे संचालक बप्पसाहेब पारनेरे, संजय शिंदे, बप्पासाहेब लांडे, विष्णुपंत बोडखे, भास्कर खेडकर आदी प्रमुख उपस्थित होते.  

शेवटचा घटक समजुन कामगारांसाठी काम करायचे आहे. तुमच्या चेह-यावरील जे हास्य दिसते त्यातच आम्हाला समाधान वाटते, असेही डॉ. क्षितीज घुले यावेळी म्हणाले . 

यावेळी नरवडे, कोळगे, मडके आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. अशोक उगलमुगले यांनी तर सुत्रसंचालन मच्छिंद्र पानकर यांनी केले. साहेबराव कुसारे यांनी आभार यांनी मानले.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घुले यांच्या वाढदिवसानिमीत्त शेवगाव येथील पै. एकलव्य प्रतिष्ठाणच्याच्या वतीने मिरी रस्त्यावरील महेश महाराज हरवणे यांच्या आश्रमातील बालकांना 50 किलो गहु, 50 किलो तांदुळ व केळी भेट देण्यात आल्या. यावेळी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संतोष जाधव, सय्यब शेख, देवानंद ढाकणे, अक्षय भुसारी, सुरेश शिंदे, अनिकेत मगर, विष्णू गायकवाड, अजय मगर आदी युवक उपस्थित होते.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com