कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने कर्जतमध्ये शरद पवार नातवाचे ब्रॅंडिंग करणार का?

जिल्ह्यात येत्या 24 व 25 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाजनादेश यात्रा येत असून, 25 तारखेला जामखेड येथे सभा होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रोहित यांनी विविध उपक्रमांच्या विकास कामांच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढला आहे, तर त्यांच्या मातोश्री बारामती एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी सोबतीच्या माध्यमातून शालेय मुली व महिलांचे समोपदेशन करीत मोफत सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करीत आपलेसे केले आहे. लोकसभेच्या प्रचार सभेनंतर पवार प्रथमच तालुक्यात येत असून, त्यांच्या या दौऱ्याची तालुक्यात राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा आहे.
कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने कर्जतमध्ये शरद पवार नातवाचे ब्रॅंडिंग करणार का?

कर्जत (नगर) : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांच्या पुढाकारातून आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेशा मैदानात साहेब चषक कुस्ती स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेत राज्यातील मल्ल सहभागी होणार आहेत. इराण आणि भारत कुस्ती हे स्पर्धेचे आकर्षण आहे. उद्या (ता. १९) या स्पर्धेचे बक्षीस वितरण आणि समारोप सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार असून, या निमित्ताने कर्जत-जामखेड मतदारसंघातील उमेदवारीबाबत आजोबा नातवाचे ब्रँडिंग करतात काय ? तसेच पक्षाची राज्यात पडझड होत असताना व तालुक्यातील एक गट वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न करीत असताना नेमका कोणता कानमंत्र देतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात येत्या 24 व 25 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाजनादेश यात्रा येत असून, 25 तारखेला जामखेड येथे सभा होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रोहित यांनी विविध उपक्रमांच्या विकास कामांच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढला आहे, तर त्यांच्या मातोश्री बारामती एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी सोबतीच्या माध्यमातून शालेय मुली व महिलांचे समोपदेशन करीत मोफत सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करीत आपलेसे केले आहे. लोकसभेच्या प्रचार सभेनंतर पवार प्रथमच तालुक्यात येत असून, त्यांच्या या दौऱ्याची तालुक्यात राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा आहे.

येत्या विधानसभेच्या निवडणुकीत येथे पालकमंत्री प्रा. राम शिंदे व युवक नेते रोहित पवार यांच्या संभाव्य लढतीची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र आघाडीच्या वाटपात कर्जत- जामखेडची जागा काँग्रेसला असून, आम्ही शेवटपर्यंत हक्क सोडणार नसल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके हे ठामपणे सांगत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि पवार यांचे सख्य सर्वश्रुत आहे. येथील काँग्रेस थोरात यांना मानणारी आहे. त्यामुळे येथे श्रीगोंदा पॅटर्न राबवून एकास एक लढत देण्यासाठी या जागेचा नातवासाठी आग्रह आणि शब्द थोरले साहेब थोरात यांच्याकडे टाकतात काय ? हा उत्सुकतेचा विषय आहे. 

त्यातच पक्षाकडून उमेदवारी साठी इच्छुक असलेल्या राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड, त्यांचे पती पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुंड, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समितीचे सभापती उमेश परहर यांनी मोजक्या प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काल रात्री कुळधरण येथे स्नेहभोजन घेतले. या बाबतीत प्रचंड व्यासंग, अनुभव आणि समयसूचकता असलेले  पक्षाचे सर्वेसर्वा पवार काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. एकंदरीत निमित्त जरी कुस्ती स्पर्धेचे असले, तरी त्याला आगामी विधानसभेच्या निवडणुकीचा रंग असल्याने तालुक्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com