इंदुरीकर समर्थक स्मिता अष्टेकर यांच्यावर पोलिस कारवाई

नगरमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून भिंगार पोलिसांनी अष्टेकर यांना ताब्यात घेतले.
nagar police booked smita ashtekar
nagar police booked smita ashtekar

नगर : इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आज पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई नगरला येणार आहेत. त्यांना न येऊ देण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकारी स्मिता अष्टेकर यांनी सोशल मीडियावरून धमकी दिली होती. त्यामुळे भिंगार पोलिसांनी आज अष्टेकर यांना सुपेजवळील म्हसणे फाटा येथे ताब्यात घेतले आहे.

निवृत्ती देशमुख महाराज (इंदुरीकर) यांनी केलेल्या वक्तव्याबाबत देसाई यांनी महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्या आज नगरला येणार असल्याचे सोशल मिडियावरून व्हायरल झाले होते. त्या विरोधात शिवसेनेच्या पदाधिकारी अष्टेकर यांनी त्यांना नगरला न येऊ देण्याबाबत आव्हान दिले होते. त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल करून त्यात देसाई यांना मारहाण करण्याबाबत धमकी दिली होती. त्यामुळे नगरमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून भिंगार पोलिसांनी अष्टेकर यांना ताब्यात घेतले. 

दरम्यान, देसाई पुण्याहून नगरला येण्यासाठी निघाल्या असल्याचे समजते. त्यामुळे पुणे मार्गावर इंदोरीकर समर्थकांनी ठिकठिकाणी तळ ठोकला असल्याचे समजते. याचाच एक भाग म्हणून शहरात आवश्यक त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पुणे महामार्गावरही पोलिसांची गस्त वाढविली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com