Nagar Parishad Elections will be through One Ward System | Sarkarnama

नगरपरिषदांच्या निवडणूक एकसदस्यीय पद्धतीने होणार

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 15 जानेवारी 2020

तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने सत्तेत असताना नगरपरिषदांमधे बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीचा अवलंब केला होता. या निर्णयात बदल करून पुन्हा एक प्रभाग एक सदस्य हे धोरण स्विकारण्यात आले आहे

मुंबई : नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पद्धतीचा अवलंब करण्यासाठी अधिनियम सुधारण्यासाठी अध्यादेश काढण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने सत्तेत असताना नगरपरिषदांमधे बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीचा अवलंब केला होता. या निर्णयात बदल करून पुन्हा एक प्रभाग एक सदस्य हे धोरण स्विकारले आहे. याबाबत आजच्या मंत्रीमंडळात त्यावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले.

महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्यागिक नगरी अधिनियम 1965 मधील कलम 10(2) मध्ये नगरपरिषद निवडणुकांकरीता प्रभाग पद्धती व सदस्य संख्या याबाबतच्या तरतूदी आहेत. 2017 मध्ये केलेल्या सुधारणेनुसार सद्यस्थितीत नगरपरिषद क्षेत्रात बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. या तरतूदीनुसार प्रभागात शक्‍य असेल तिथे 2 परंतू 3 पेक्षा अधिक नाहीत इतके परिषद सदस्य निवडून येतात. नगर परिषद क्षेत्राचा विकास प्रभागातील गतीमान करण्यासाठी एक सदस्यीय पद्धत लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीची केलेली तरतूद प्रस्तावित महाराष्ट्र नगरपरिषद (सुधारणा) अधिनियम 2019 च्या सुरुवातीच्या निवडणुकांपुरतीच लागू असणार आहे. सदर निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी विधी व न्याय विभागाच्या सल्ल्यानुसार आवश्‍यक सुधारणांसह अध्यादेश मसूदा निश्‍चित करण्यात येणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख