काँग्रेस दिशाहिन, राष्ट्रवादी प्रायव्हेट लिमिटेड : विखे पाटील

"देशात कॉंग्रेसची मोठीच पीछेहाट झाली. या पक्षाला दिशाच राहिलेली नाही. त्यातही आता विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रातदेखील या पक्षाचे फक्त प्रदेशाध्यक्ष शिल्लक राहतील. तसेच त्यांचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची प्रायव्हेट लिमिटेड पार्टी झालेली आहे,'' अशी खिल्ली गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उडविली.
Radhakrishna Vikeh Patil
Radhakrishna Vikeh Patil

नगर  : "देशात कॉंग्रेसची मोठीच पीछेहाट झाली. या पक्षाला दिशाच राहिलेली नाही. त्यातही आता विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रातदेखील या पक्षाचे फक्त प्रदेशाध्यक्ष शिल्लक राहतील. तसेच त्यांचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची प्रायव्हेट लिमिटेड पार्टी झालेली आहे,'' अशी खिल्ली गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उडविली.

शिर्डी विधानसभा मतदारसंघातील भाजपतर्फे उमेदवारी करत असलेल्या विखे पाटील यांनी मतदारसंघातील डोऱ्हाळे, वाळकी या गावांत प्रचारसभा घेतल्या. त्या वेळी ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते रावसाहेब जपे होते. विखे पाटील म्हणाले, "शेतकऱ्यांना कर्जमाफीसह मराठा समाजाला आरक्षण, धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गाच्या 22 सवलती लागू करण्याचा धाडसी निर्णय भाजप सरकारने घेतला. त्या उलट शरद पवार तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांनी धनगर, मराठा, तसेच अन्य समाजाच्या प्रश्‍नांची काय सोडवणूक केली? असा प्रश्‍न पडतो.''

सरकारच्या मध्यस्थीने शिर्डी विमानतळाच्या विकासासाठी साईबाबा संस्थानकडून निधी मिळवून दिला. या विमानतळाचा पुढे विस्तार होईल. या विकासात्मक कामातून याच भागातील तरुणांना रोजगार मिळेल. ही कामे पूर्ण करण्यासाठी मतदार नक्कीच पुन्हा मोठ्या मताधिक्‍याने संधी देतील, असेही ते म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com