Nagar news - mayor kadam | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

महापौर झाले म्हणून काय झाले.. झोका तर खेळणारच!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 28 जुलै 2017

महापौर झाले, तरी पंचमीचा झोका खेळण्याची मजा काही वेगळीच असते. दरवर्षी आपल्या मैत्रीणींबरोबरच झोका खेळणाऱ्या नगर महापालिकेच्या महापौर सुरेखा कदम यांनी या वर्षी आपल्या नव्या नगरसेवक असलेल्या मैत्रीणींसोबत झोका खेळण्याचा आनंद घेतला.

नगर : महापौर झाले, तरी पंचमीचा झोका खेळण्याची मजा काही वेगळीच असते. दरवर्षी आपल्या मैत्रीणींबरोबरच झोका खेळणाऱ्या नगर महापालिकेच्या महापौर सुरेखा कदम यांनी या वर्षी आपल्या नव्या नगरसेवक असलेल्या मैत्रीणींसोबत झोका खेळण्याचा आनंद घेतला.

पंचमीनिमित्त उंच झोका नेण्याची अनेक महिलांना हौस असते. मात्र शहरात मोठ्या वृक्षांना नव्हे, तर परिसरातच लहान झोका बांधून पंचमीची मजा लुटता येते. बहुतेक महिला, मुली झोका खेळून हा सण साजरा करतात. नगरच्या महापौर असलेल्या कदम यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही झोका खेळल्या. त्यांच्यासमवेत नगरसेविका सारिका भुतकर, सुनीता मुदगल, उषा ठाणगे, विना बोज्जा, दीपाली बारस्कर, आशा बडे आदी उपस्थित होत्या.

राजकारणाचा झोकाही उंचच
महापौर कदम यांचे पती संभाजी कदम यांनी शिवसेनेच्या माध्यमातून शहरात आपले स्थान बळकट केले. त्याचा परिणाम म्हणून पत्नीला महापौरपदाच्या खुर्चीवर बसविता आले. पतीचाच कित्ती गिरवित सुरेखा कदम यांनी चांगले काम करून लोकांची मने जिंकली आहेत. सण, उत्सवांमध्ये त्या हिरीरीने भाग घेतात. महापालिकेतील इतर नगरसेविकांना त्यांचे कौतुक वाटते. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स

संबंधित लेख