श्रीगोंद्यात बापूंनी डिवचले; तात्या सावध झाले

श्रीगोंदे तालुक्यातील प्रस्थ व जिल्ह्याच्या राजकारणात तात्या म्हणून प्रसिद्ध असलेले कुंडलिकराव जगताप आणि बापू या नावाने परिचित असलेले शिवाजीराव नागवडे यांचे राजकीय वैर असले, तरी प्रसंगी निवडणुकांत एकमेकांना त्यांनी मदतही केली आहे. पण नुकतेच नागवडे यांनी जगताप यांचा मुलगा आमदार राहुल जगताप यांच्या कामात नाराजी दर्शवून एकप्रकारे डिवचले. यावर मात्र कुंडलिकराव जगताप यांनी उत्तर देताना, `वडिलकीच्या नात्याने तुम्ही राहुलला विचारू शकता. कॉंग्रेस व राष्टवादीने तुम्हास आगामी विधानसभेचे तिकिट दिले, तर तुमचा झेंडा हाती घेऊ, असे सूचक उत्तर दिले. त्यामुळे सध्या नागवडे यांनी डिवचले असले, तरी जगताप सावधगिरीची भूमिका घेताना दिसत आहेत.
श्रीगोंद्यात बापूंनी डिवचले; तात्या सावध झाले

नगर : श्रीगोंदे तालुक्यातील प्रस्थ व जिल्ह्याच्या राजकारणात तात्या म्हणून प्रसिद्ध असलेले कुंडलिकराव जगताप आणि बापू या नावाने परिचित असलेले शिवाजीराव नागवडे यांचे राजकीय वैर असले, तरी प्रसंगी निवडणुकांत एकमेकांना त्यांनी मदतही केली आहे. पण नुकतेच नागवडे यांनी जगताप यांचा मुलगा आमदार राहुल जगताप यांच्या कामात नाराजी दर्शवून एकप्रकारे डिवचले. यावर मात्र कुंडलिकराव जगताप यांनी उत्तर देताना, `वडिलकीच्या नात्याने तुम्ही राहुलला विचारू शकता. कॉंग्रेस व राष्टवादीने तुम्हास आगामी विधानसभेचे तिकिट दिले, तर तुमचा झेंडा हाती घेऊ, असे सूचक उत्तर दिले. त्यामुळे सध्या नागवडे यांनी डिवचले असले, तरी जगताप सावधगिरीची भूमिका घेताना दिसत आहेत.

तीन नेत्यांभोवती श्रोगोंद्याचे राजकारण
श्रीगोंदे तालुक्यातील राजकारणाकडे नेहमीच जिल्ह्याचे लक्ष लागलेले असते. माजी मंत्री बबनराव पाचपुते (भाजप), कुकडी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक कुंडलिकराव जगताप (राष्ट्रवादी) व श्रीगोंदे साखर कारखान्याचे सर्वेसर्वा शिवाजीराव नागवडे (कॉंग्रेस) या तीन नेत्यांभोवती श्रीगोंद्याचे राजकारण कायम फिरते. नागवडे कॉंग्रेसचे नेते. जगताप हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निस्सीम भक्त. मात्र सध्या भारतीय जनता पक्षात असलेले पाचपुते यांनी अनेकदा पक्ष बदलून सत्ता मिळविली. एव्हाना सत्तेसाठी पक्षबदल हे त्यांचे समिकरण.

कारखाना उभारताना नागवडे विरोधक
कुंडलिकराव जगताप यांच्या राजकीय कारकीर्दीत शिवाजीराव नागवडे हे त्यांचे एकेकाळचे राजकीय वैरी. कुकडी कारखाना उभारताना, शैक्षणिक संकुल उभारताना नागवडे गटाने केलेला विरोध व खेळलेली खेळी श्रीगोंद्याची जनता विसरली नाही. असे असले, तरी आमदार होण्याचे कुंडलिकराव जगताप यांचे स्वप्न विरोधकांनी पूर्ण होऊ दिले नाही. त्यात नागवडे यांचा हात होता. एका विधानसभा निवडणुकीत जगताप यांची उमेदवारी कापून शिवाजीराव नागवडे यांचे पूत्र राजेंद्र नागवडे यांना दिली. जगताप यांनी मात्र मुलगा राहुल जगताप यांना आमदार करून आपल्या जिद्दीची व ताकदीची चुनूक दाखवून दिली. असे असले, तरी बबनराव पाचपुते यांचे प्रस्थ रोखण्यासाठी या दोघांनीही कायम लढा दिला.

शत्रूचा शत्रू तो मित्र
राजकारणात शत्रुचा शत्रू मित्र होतात, हेच जणू जगताप-नागवडे यांनी दाखवून दिले आहे. मागील दशकात पाचपुते यांचा सुसाट सुटलेला वारू या दोघांनाही रोखणे मुश्किल होत होते. त्यानिमित्ताने हे एकत्र आले. आता मात्र या दोघांचीही पुढील पिढी म्हणजे राहुल जगताप व राजेंद्र नागवडे यांची सलगी होताना दिसत होती. असे असताना नागवडे यांनी जगताप यांच्यावर नुकताच टाकलेला राजकीय बॉम्ब किती विनाशकारी आहे, हे काळानुरुप समजेल. बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव विक्रम पाचपुते यांना रोखण्यासाठी या दोघांचे हातात हात दिसून येत होते, मात्र आता चित्र उलटे होऊ लागले आहे.

आता पाचपुतेंचा पत्ता कट : जगताप
आमदार राहुल जगताप व शिवाजीराव नागवडे यांच्यात वितुष्ठ निर्माण करण्यासाठी काही मंडळी षड्यंत्र रचत आहेत. राहुल जगताप यांना आमदार करण्यात नागवडे यांची साथ होती. आगामी निवडणुकीत नागवडे यांना दोन्ही कॉंग्रेसकडून तिकीट मिळाले, तर आपण नागवडेंचा झेंडा हाती घेऊ, पण पाचपुते यांना आता आमदार कदापि होऊ देणार नाही, असे कुंडलिकराव जगताप यांनी एका कार्यक्रमात जाहीर करून पाचपुतेंविरोधात पुन्हा देंड थोपाटले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com