गडाखांचा नवीन पायंडा; मुरकुटे, लंघेसह ससे यांना घरी जाऊन दिल्या शुभेच्छा

आमदार शंकरराव गडाख यांच्या सुचनेनुसार प्रशांत गडाख यांनी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे , जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे व उद्योगपती प्रभाकर ससे -शिंदे यांच्या घरी जाऊन दिवाळीचा फराळ देऊन शुभेच्छा देत राजकारणात कटूता न ठेवता राजकीय वाटचाल चालू ठेवण्याचा नवीन पायंडा ठेवला आहे . मुरकुटे यांच्या निवासस्थानी आशा मुरकुटे, विष्णू मुरकुटे उपस्थित होते. लंघे, मुरकुटे व ससे यांनी प्रशांत गडाख यांचा सन्मान केला.
Prashant Gadhakh Meets Prabhakar Sase, Balasaheb Murkute
Prashant Gadhakh Meets Prabhakar Sase, Balasaheb Murkute

नेवासे (नगर)  : आमदार शंकरराव गडाख यांच्या सुचनेनुसार प्रशांत गडाख यांनी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे , जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे व उद्योगपती प्रभाकर ससे -शिंदे यांच्या घरी जाऊन दिवाळीचा फराळ देऊन शुभेच्छा देत राजकारणात कटूता न ठेवता राजकीय वाटचाल चालू ठेवण्याचा नवीन पायंडा ठेवला आहे . मुरकुटे यांच्या निवासस्थानी आशा मुरकुटे, विष्णू मुरकुटे उपस्थित होते. लंघे, मुरकुटे व ससे यांनी प्रशांत गडाख यांचा सन्मान केला.

निवडणुकीची धामधूम झाल्यावर राजकीय कटूता न ठेवता विजयी झाल्यावर जनतेच्या प्रश्नांसाठी आपली शक्ती खर्च करावी, असे जुने जाणते लोक नेहमी बोलत असतात. त्याप्रमाणेच शंकरराव गडाख यांनी आमदारकीची माळ गळ्यात पडल्यावर सोनई येथील आभार सभेत बोलतांना सांगितले होते, की कार्यकर्त्यांनी संयम ठेवावा व विरोधकांच्या घरासमोर कुणीही फटाके फोडू नये. गुलाल उधळू नये. मी माझी सर्व शक्ती सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लावणार आहे. तसेच प्रशांत गडाख यांनीही सोशल मीडियावर मित्रानो विजय पचवायला शिका व शांतता राखा, असे आहवान केले होते . जेष्ट नेते यशवंतराव गडाख यांची परंपरा त्यांचे दोन्ही मुलांसह विरोधानकानीही जपली असून, याचा आनंद झाल्याचे जेष्ठ कार्यकर्त्यांनी बोलून दाखविले आहे.

दीपावलीच्या मुहूर्तावर प्रशांत गडाख यांनी सकाळी प्रभाकर ससे यांच्या खुपटी येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर शिरसगाव येथे जाऊन विठ्ठलराव लंघे यांचीही भेट घेतली. लंघे व ससे यांनी प्रशांत गडाख यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. दरम्यान,  2009च्या विधानसभा निवडणुकीत दिवाळीत आमचा पराभव झाला होता. आमच्या घरातील सदस्यांनी दिवाळीही साजरी केली नव्हती. याची आम्हाला जाणीव असून, निवडणुका झाल्यावर मनातील कटूता जावी, यासाठी मी भेट दिली असून, यात कुठलेही राजकारण नसल्याचे प्रशांत गडाख यांनी सांगितले .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com