टक्केवारीचे आरोप पाची पांडवांना झोंबले; कर्डिलेंची लक्तरे टांगण्यास सर्व सरसावले

सारोळा कासार (ता. नगर) येथे आमदार कर्डिले यांनी महाआघाडीचे जिल्हा परिषद सदस्य टक्केवारी घेतात, असा आरोप केला होता. या आरोपाचे खंडन करण्यासाठी संबंधित सदस्यांनी पत्रकार परिषद घेवून आमदार कर्डिले यांच्यावर आरोपाचा भडीमार केला. जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे,अनिल कराळे, पंचायत समितीचे सभापती रामदास भोर तसेच बाळासाहेब हराळ यांनी कर्डिले यांच्यावर आरोप केले
टक्केवारीचे आरोप पाची पांडवांना झोंबले; कर्डिलेंची लक्तरे टांगण्यास सर्व सरसावले

नगर : जिल्हा परिषद सदस्य टक्केवारी घेतात, हा आमदार शिवाजी कर्डिले यांनी केलेला आरोप नगर तालुक्यातील महाआघाडीच्या पाच सदस्यांना (पांडव) चांगलाच झोंबला. या आरोपाचे खंडन करीत पाचही जणांनी आमदार कर्डिले यांची लक्तरे वेशीला टांगू, असे जाहीर करून त्यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत.

सारोळा कासार (ता. नगर) येथे आमदार कर्डिले यांनी महाआघाडीचे जिल्हा परिषद सदस्य टक्केवारी घेतात, असा आरोप केला होता. या आरोपाचे खंडन करण्यासाठी संबंधित सदस्यांनी पत्रकार परिषद घेवून आमदार कर्डिले यांच्यावर आरोपाचा भडीमार केला. जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे,अनिल कराळे, पंचायत समितीचे सभापती रामदास भोर तसेच बाळासाहेब हराळ यांनी कर्डिले यांच्यावर आरोप केले. ''जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी आमदार कर्डिले यांनी सहा-सहा लाख, तर पंचायत समितीच्या सदस्यांकडूनही तीन लाख घेतल्याचे समजते. आम्हाला जर टक्केवारी घ्यायची असेल, तर आमदार कर्डिले यांच्याकडून आधी प्रशिक्षण घ्यावे लागेल. टक्केवारी कशी घ्यायची, यात ते निपूण आहेत. पैसे कोण खातो, हे लोकांना सांगण्याची गरज नाही," असा आरोप कार्ले यांनी केला.

''आता यापुढे आमच्या वाट्याला जाल, तर तुमची संपूर्ण खानेसुमारी काढल्याशिवाय राहणार नाही. तुमची लक्तरे वेशीला टांगू. साकळाई योजना विकून तुम्ही मंत्री झालात. नगर तालुक्याच्या पाणीप्रश्नावर तुम्ही कधीच तोंड उघडले नाही,'' असा घणाघाती आरोप हराळ यांनी आमदार कर्डिले यांच्यावर केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com