Nagar Mayor Election Process Starts | Sarkarnama

नगर महापौर निवडीसाठी आज गटनोंदणी; नगरसेवक सहलीला जाणार

मुरलीधर कराळे
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

काल सायंकाळी बहुतेक नगरसेवक नाशिकला दाखल झाले आहेत. शिवसेनेचे सर्वाधिक २४ नगरसेवक आहेत. त्यांची गटनोंदणी शिवसनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. भाजपच्या १४ नगरसेवकांची गटनोंदणी होण्यासाठी नगरसेवक तथा शहर भाजपचे उपाध्यक्ष किशोर डागवाले यांच्यावर सोपविण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या १८ नगरसेवकांची गटनोंदणी होणार आहे. तर काँग्रेसच्या पाच नगरसेवकांची स्वतंत्र गटनोंदणी होणार आहे. 

नगर : महापालिकेच्या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत महापाैर कोणत्या पक्षाचा होणार, याबाबत खलबते सुरू आहेत. त्रिशंकू अवस्था झाल्याने ही स्थिती निर्माण झाली असली, तरी कमी जागा मिळेलेल्या भाजपलाच जास्त भाव आला आहे. जास्त जागा असलेल्या शिवसेनेचा महापाैर होणे अपेक्षित असताना आघाडीसाठी कमी जागा मिळालेल्या भाजपला संधी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. आज नाशिकला गटनोंदणी होऊन लगेचच नगरसेवक सहलीला जाण्याची शक्यता आहे.

काल सायंकाळी बहुतेक नगरसेवक नाशिकला दाखल झाले आहेत. शिवसेनेचे सर्वाधिक २४ नगरसेवक आहेत. त्यांची गटनोंदणी शिवसनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. भाजपच्या १४ नगरसेवकांची गटनोंदणी होण्यासाठी नगरसेवक तथा शहर भाजपचे उपाध्यक्ष किशोर डागवाले यांच्यावर सोपविण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या १८ नगरसेवकांची गटनोंदणी होणार आहे. तर काँग्रेसच्या पाच नगरसेवकांची स्वतंत्र गटनोंदणी होणार आहे. 

हे नगरसेवक डाॅ. सुजय विख पाटील यांच्या इशाऱ्यावर कोणाला पाठिंबा देतात, हे अद्याप निश्चित नाही. बसपाच्या चार नगरसेवकांची गटनोंदणी स्वतंत्रपणे होणार असल्याने त्यांची भूमिकाही महापाैर निवडीत महत्त्वाची ठरणार आहे. एकूणच गटनोंदणी करून हे नगरसेवक लगेचच सहलीला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत मोठ्या घडामोडी होऊन कोण कोणाला पाठिंबा देतो, आणि कोणाची महापौरपदासाठी वर्णी लागते, याबाबत उत्सुकता आहे.

महापौर कोण होणार
शिवसेनेमध्ये महापौरपदासाठी गणेश कवडे, सुभाष लोंढे, बाळासाहेब बोराटे, योगिराज गाडे व अनिल शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेची सर्व सूत्रे माजी आमदार अनिल राठोड यांच्याकडे असल्याने ते सांगतील, त्याच नावाची घोषणा मोतोश्रीहून होणार आहे.
भाजपकडून तिसऱ्यांदा नगरसेवक झालेले बाबासाहेब वाळके महापौर होण्याच्या स्पर्धेत आहेत. तसेच भैय्या गंधे यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. 

खासदार दिलीप गांधी व पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या इशाऱ्यावरच महापौर कोणाला करायचे, याचा आदेश वरिष्ठ पातळीवरून येणार आहे. राष्ट्रवादीमध्ये आमदार शिवाजी कर्डिले यांची कन्या असलेल्या ज्योती गाडे यांना संधी मिळेल. त्यासाठी आमदार कर्डिले यांचे जोरदार प्रयत्न आहेत. महापौरपदाची खुर्ची मिळविण्यासाठी आता जोरदार राजकीय खेळी सुरू होत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख