कोणी काहीही म्हटले तरी नगरची जागा राष्ट्रवादी लढविणार : पिचड 

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा कॉग्रेसला डॉ. सुजय विखे यांच्यासाठी हवी आहे. पण ती देण्यास राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते इच्छुक नाहीत. याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यापूर्वीही ठणकावून सांगितले होते. आता त्यात भर घालत माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी ही जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचे म्हटले आहे.
कोणी काहीही म्हटले तरी नगरची जागा राष्ट्रवादी लढविणार : पिचड 

नगर : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा कॉग्रेसला डॉ. सुजय विखे यांच्यासाठी हवी आहे. पण ती देण्यास राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते इच्छुक नाहीत. याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यापूर्वीही ठणकावून सांगितले होते. आता त्यात भर घालत माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी ही जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचे म्हटले आहे. 

कॉग्रेस व राष्ट्रवादीच्या युतीमध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा कॉग्रेसला, तर नगर लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीला देण्याचे ठरलेले आहे. युती झाल्यापासून त्यात खंड पडलेला नाही. या वर्षी मात्र आदलाबदल करण्याचे प्रयत्न विखे पाटील यांनी केले. त्यासाठी थेट कॉग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापर्यंत प्रदेशाध्यक्षांमार्फत जाण्याची तयारी केली. मात्र त्याला अद्याप यश आले नाही. इकडे राष्ट्रवादीचे नेते मात्र ही जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचे ठणकावून सांगत आहे. 

या पूर्वी माजी उपमुख्यंत्री अजित पवार यांनी नगर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात जाहीर कार्यक्रमात या जागेविषयी वक्तव्य केले होते. कोणत्याही परिस्थितीत ही जागा कॉग्रेसला देणार नाही. राष्ट्रवादीच ही जागा लढवून जिंकेल, असे सुतोवाच केले होते. 

काल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव पिचड जामखेड येथे राळेभात कुटुंबियांना भेट देण्यास आले होते. त्यावेळी नगरला बोलताना त्यांनी लोकसभेच्या जागेबाबत पुनरुच्चार केला. कोणी काहीही म्हटले, तरी राष्ट्रवादी जागा लढविणार, असे त्यांनी सांगितले. या शिवाय ज्यांना लोकसभा लढवायची, त्यांनी खुशाल राष्ट्रवादीत या असा उपरोधात्मक टोला विखे पाटील यांना लगावला आहे. त्यामुळे विखेंच्या गळाला ही जागा लागण्याची शक्‍यता आता धूसर झाली आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com